ETV Bharat / state

काँग्रेसमध्ये मतभेद, सुशीलकुमार शिंदेंचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध - शिवसेनाला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद

राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी उघडपणे सेनेला पाठिंबा देण्याला विरोध दर्शवला आहे.

काँग्रेसमध्ये मतभेद
author img

By

Published : Nov 1, 2019, 5:09 PM IST

मुंबई - राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी उघडपणे सेनेला पाठिंबा देण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच आज झालेल्या दिल्लीतील बैठकीमध्ये काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे.

राज्यात भाजपला सर्वात जास्त मताधिक्‍य मिळाले असले तरी अद्यापही भाजपने सत्ता स्थापण्याचा दावा केला नाही. शिवसेना अजूनही भाजपला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्याला पाठिंबा देण्यासाठी काय निर्णय घेता येईल? यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी आज दिल्लीत अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, नाही याविषयी चर्चा झाली. मात्र, सध्या कोणताही निर्णय झाला नसून वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विषयावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सेनेला पाठिंबा देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये काही नेत्यांमध्ये शिवसेनेच्या पाठींब्‍यावरून मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर काँग्रेसचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष

mh-mum-01-cong-sena-gover-7201153

(फाईल फोटो वापरावेत)

मुंबई, ता. 10 :
राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी उघडपणे सेनेला पाठिंबा देण्याच्या विषयावर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपाला सर्वात मताधिक्‍य मिळाले असले तरी अद्यापही भाजपने सत्ता स्थापण्याचा दावा केला नाही. शिवसेना अजूनही भाजपाला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्याला पाठिंबा देण्यासाठी काय निर्णय घेता येईल यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर अनेक नेते आज दिल्लीत असून अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासोबत एक बैठक सुरू सुरू आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, नाही याविषयी चर्चा सुरू असून यासाठी अंतिम निर्णय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या घेणार आहेत. त्यासाठी चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
असं काही माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विषयावरून आपली नाराजी व्यक्त केली असून पाठिंबा देऊ नये असे मतही व्यक्त केले. तसेच मत मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केले असून त्यामुळे काँग्रेस मध्ये काही नेत्यांमध्ये शिवसेनेच्या पाठींब्‍यावरुन मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे यापासून काँग्रेसचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्षConclusion:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.