मुंबई - 'रिपब्लिक टीव्ही' या वाहिनीशी संबंधित टीआरपी घोटाळ्यातील नवनवीन माहिती समोर येत असून रिपब्लिकचे कार्यकारी संपादक अर्णव गोस्वामी आणि प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. हे संभाषण वास्तव असून हा महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचे गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे. दासगुप्ता व अर्णव गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप संभाषणाचे स्क्रीनशॉट शुक्रवारी समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरले.
अर्णव गोस्वामी व्हाट्सअप चॅटिंग हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे
अर्णव गोस्वामींबद्दल जे काही ते चॅटिंग समोर आले आहेत, याची केंद्र सरकारतर्फे चौकशी झाली पाहिजे, हा मुद्दा केवळ व्हाट्सअप चॅटिंगसंदर्भात नसून राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात देखील आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अर्णव गोस्वामी यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. टीआरपी घोटाळा व त्यातील व्हाट्सअप चॅटिंग लीक म्हणजे केवळ एक अपराधच नाही तर देशाच्या सुरक्षेसंदर्भातील त्रुटी असल्याचे यावेळेस काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी सांगितले.