ETV Bharat / state

Congress Vs BJP : महाराष्ट्रातही भाजपावर लागणार कमिशन, भ्रष्टाचाराचे आरोप? - भाजपवर लागणार कमिशन

कर्नाटकमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपावर ४० टक्के कमिशनचा आरोप लागला व भाजपाच्या हातातून सत्ता गेली. त्याच पद्धतीचा ५० टक्के कमिशनचा आरोप आता मध्य प्रदेशमध्ये भाजपावर होत असून, या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावरसुद्धा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण याच पद्धतीचे आरोप महाराष्ट्रातही भाजपावर लागण्याची दाट शक्यता काँग्रेसचे नेते राजेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

Bjp commission allegations
भाजपवर ४० टक्के कमिशनचा आरोप
author img

By

Published : Aug 14, 2023, 9:28 PM IST

मुंबई : मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय संपादन केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपवर ४० टक्के कमिशनचा आरोप काँग्रेसकडून लावण्यात आला व निवडणुकीत तशा पद्धतीची रणनीती प्रचारादरम्यान आखली गेली. त्याचा पुरेपूर फायदा हा काँग्रेसला झाला व कर्नाटकमधील भाजपचे सरकार खाली खेचण्यात काँग्रेस यशस्वी ठरले. आता मध्य प्रदेशमध्ये अशाच पद्धतीने शिवराज सिंह चौहान भाजपच्या सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप लावण्यात आला आहे. तशा पद्धतीचे ट्विट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांच्याकडून करण्यात आले होते. या कारणास्तव प्रियंका गांधी त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मंत्री अरुण यादव यांच्यावर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला आहे. परंतु यासर्व घटनांचे पडसाद येणाऱ्या दिवसांत इतर राज्यातही दिसून येणार आहेत.

योग्य वेळी योग्य पुरावे सादर होतील : कमिशनच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी सांगितले आहे की, कर्नाटकमध्ये भाजपवर ४० टक्के कमिशनचा आरोप लावण्यात आला. त्यात तथ्य होते म्हणूनच जनतेने भाजप सरकारला नाकारले. काँग्रेसने तेथे दणदणीत विजय संपादन केला. अशाच पद्धतीने मध्यप्रदेश मध्ये सुद्धा भाजपवर ५० टक्के कमिशनचा आरोप लागला आहे. तेथेही काँग्रेसचेच सरकार येणार असा दृढ विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करण्यात माहीर आहे. पण कमिशनच्या मुद्द्यावर जनता त्रस्त आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेतले जात आहे. महाराष्ट्रातील अगोदर शिंदे - फडणवीस व आता अजित पवार यांचे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, हे जनता खुल्या डोळ्याने बघत आहे. सरकारच्या विविध योजना असतील, पोलिसांच्या बदल्या असतील, नोकर भरती असेल सर्वच बाबतीत कमिशन शिवाय काम होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे.

५० खोके झाले एकदम ओके : महाराष्ट्रात विशेष करून मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यातील खड्याच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. कोणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे. दीड वर्ष प्रशासकाच्या हाती सत्ता असल्याने भ्रष्टाचार फोफावत आहे. पुढच्या वर्षी २०२४ साली महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुकीत हे मुद्दे नक्कीच समोर येतील व जनता या मुद्द्यावर आमच्या सोबत राहील व शिंदे - फडणवीस - अजित पवार गटाचे सरकार महाराष्ट्रातून हद्दपार होईल. ५० खोके एकदम ओके असे म्हणणारे अजित पवार गट सरकार सत्तेत सामील झाला. मग ५० खोके खरोखर एकदम ओके झाले असे म्हणायचे का? असा सवालही शर्मा यांनी उपस्थित केला आहे. कमिशन विषयी जे पुरावे समोर येतील ते योग्यवेळी योग्य त्या पद्धतीने जनतेसमोर मांडले जातील असेही राजेश शर्मा म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. Parliament Monsoon Session 2023 : निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात येणार? राज्यसभेतील विधेयकावरून नवा वाद
  2. Sharad Pawar With BJP : मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतो...; भाजपासोबत जाण्याच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण
  3. Election Commission : मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी राजकीय पक्षांना पाचारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.