ETV Bharat / state

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते दिल्लीत; सोनिया गांधी घेणार उलटतपासणी

कोरोनाकाळात राज्यात काँग्रेसकडून जनतेच्या हिताची कोणती काम करण्यात आली. तसेच राज्य सरकारने कोण-कोणती विकासकामे केली याबाबतचा आढावा देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचे माहिती आहे.

sonia gandhi
सोनिया गांधी
author img

By

Published : Sep 5, 2020, 7:09 PM IST

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत हे आपल्या वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत आहेत. राज्यातील विविध प्रकारच्या विकासकामांसोबतच पक्षातील नेत्यांमधील मतभेद आणि पक्षवाढीच्या संदर्भात सुरू असलेल्या कामकाजांसाठी सोनिया गांधी राज्यातील नेत्यांची उलटतपासणी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्यापूर्वी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची काँग्रेसचे महासचिव वेणूगोपाल यांची भेट घेतली असून लवकरच त्यांची भेट सोनिया गांधी यांच्याशी होणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रसेही त्यात सहभागी झाली. या दरम्यान काँग्रेसकडून कोरोना काळात राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या अडचणींसाठी केलेल्या गेलेल्या कामांचा आणि सरकारमधील एक पक्ष म्हणून राज्यासाठी केलेल्या विकासकामाचा आढावा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना यासाठीचा एक अहवालच घेऊन दिल्लीत बोलावण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अध‍िवेशन सुरू होत असून पक्ष म्हणून या अधिवशेनात काँग्रेसची भूमिका आणि सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवरही सोनिया गांधी माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलचा तपास 'या' मराठी अधिकाऱ्याकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.