ETV Bharat / state

Balasaheb Thorat on Political Crisis : मुख्यमंत्र्यांनी पदावर राहणे हे नैतिकतेला धरून नाही - बाळासाहेब थोरात - Shinde Fadnavis Government

सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयची सुनावणी आज पार पडली. आजच्या निकालाने तूर्तास तरी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार आहे. आजच्या निर्णयावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांचे शिवसेनेकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : May 11, 2023, 5:19 PM IST

निकालावर माहिती देताना बाळासाहेब थोरात

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्व विषयावर सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयची सुनावणी आज पार पडली. आजच्या निकालाने तूर्तास तरी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार आहे. आजच्या निर्णयावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांचे शिवसेनेकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तो अतिशय विचार करण्यात लावणारा आहे. देशातील राजकारणावरती प्रभाव करणारा हा निर्णय असणार आहे. सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केले आहे. ते सर्व बेकायदेशीर करणारा तो निर्णय आहे. राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर, अध्यक्षांचे वागणे बेकायदेशीर, शिंदे गटाकडून केलेली व्हीपची नियुक्ती बेकायदेशीर, असे असताना या सरकारला आपण कायदेशीर कसे म्हणू शकतो?. सत्ता स्थापनेसाठी केलेल काम हे सर्व बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. हे खरे की, सरकार वाचले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच पदही वाचले. असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

सरकार नैतिकेला धरून नाही: मात्र त्यांना नैतिक अधिकार आता राहिलेल्या नाही. सुप्रीम कोर्ट देखील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता आणि फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले असते. सध्याचा सरकार नैतिकेला धरून नाही तर, चांगला पायंडा पाडायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा देणे हे योग्य असणार असल्यास मत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

काकासाहेब कुलकर्णी: सत्ता संघर्षाचा आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. निकाल हा अन्यायग्रस्तांच्या बाजूने लागेल असे वाटत होते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून ज्या पद्धतीने राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत होते, त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. हे देखील निदर्शनास आणून द्यायचे की, सत्ता संघर्ष निकाल अगदी काही वेळापूर्वी लागला. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करणारे ट्विट त्यांनी केले होते. हे त्यांनी केलेले सूचक ट्विट होते.

अध्यक्ष काय निर्णय देणार?: ठरल्याप्रमाणे निकाल आमच्या विरोधात लागणार असे वाटत होते. दुर्दैव आता सर्व अधिकार विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे गेले. त्यामुळे लहान मुलगा देखील सांगू शकतो. आता अध्यक्ष काय निर्णय देणार. राज्यात अतिशय कलंकित करणारे राजकारण केले गेले आणि राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली मात्र आजच्या निकालाने हा कलंक पुसला जाईल असे वाटत होते. उलट पक्षी हा डाग अधिकच गडद करण्याचे काम आजच्या निकालाने झाला आहे. अजून देखील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सत सत विवेक बुद्धीने निर्णय देतील, अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

हेही वाच -

  1. Cabinet expansion सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत
  2. Ujjwal Nikam Reaction सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही उज्ज्वल निकम
  3. Sanjay Raut Reaction नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.