मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बहुचर्चित असलेल्या उत्तर मुंबई मतदार संघाच्या जागेवरील उमेदवारांचा समावेश नाही. अवघे २४ तास उमेदवारी अर्ज भरायला उरले असताना देखील काँग्रेसने उमेदवार घोषीत केला नाही. त्यामुळे शंका उपस्थित व्हायला लागली आहे की काँग्रेस या जागेवर आपला उमेदवार उभा करते की नाही? उत्तर मुंबई मतदार संघात गोपाळ शेट्टींचे वर्चस्व काही वर्षापासून पाहायला मिळत आहे.
मागच्या लोकसभा निवडणूकित भाजपच्या गोपाळ शेट्टींचा येथे चार लाख मते घेऊन विजय झाला होता. यामुळे याविषयी गोपाळ शेट्टी याना विचारले असता त्यांनी सांगितले की भाजप, शिवसेना, शेकाप, व आरपीआय मित्र पक्ष एकत्र येत आहेत. माझ्यासारखा उमेदवार याही वर्षी मागच्या वेळे पेक्षा अधिक मतांनी निवडणून येईन. असा ठाम निश्चिय आज गोरेगाव येथील सभेत झाला, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावर काँग्रेस उत्तर मुंबईत मतदार संघात काय भूमिका घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.