ETV Bharat / state

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन

author img

By

Published : Dec 1, 2020, 4:53 PM IST

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.

'हे' आहेत समितीतील पदाधिकारी

ही समिती 13 सदस्यीय असून समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‌ॅड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश पातळीवरील या समितीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - महावितरणची पदभरती सुरू ठेवल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून प्रकाशगड येथे आंदोलन

हेही वाचा - कोविड लशीची मालवाहतूक हाताळण्यासाठी मुंबई विमानतळ सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.