ETV Bharat / state

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 23 विद्यमान आमदारांना दिली संधी

काँग्रेसने यावेळी सावधपणे ही यादी जाहीर करून एकाही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केलेला नाही. मात्र, जे उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांच्यापैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या राहुल ठाकरे या मुलाचा पत्ता कट केला आहे.

author img

By

Published : Sep 29, 2019, 11:11 PM IST

संग्रहित छायाचित्र

मुंबई - काँग्रेसने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात विधानसभेच्या 2३ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने यावेळी सावधपणे ही यादी जाहीर करून एकाही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केलेला नाही. मात्र, जे उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांच्यापैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या राहुल ठाकरे या मुलाचा पत्ता कट करून त्याठिकाणी काँग्रेसने यवतमाळमधून अनिल मंगरूळकर हा नवीन चेहरा दिला आहे.

भोकरच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्या ठिकाणी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कोल्हापूर दक्षिण येथून मागील निवडणुकीत पराभूत झालेले सतेज उर्फ बंटी पाटील यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने या ठिकाणी त्यांच्या रुतूराज पाटील या नातेवाईकाला उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा - काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसने रविवारी जाहीर केलेल्या यादीत काँग्रेसचे विधीमंडळ नेते अॅड. के.सी. पाडवी यांना अक्कलकुवा, बुलडाणा येथून हर्षवर्धन सपकाळ, रिसोड-वाशिम येथून अमित झनक, वर्धाच्या देवळी येथून रणजीत कांबळे यांना तर धामणगाव रेल्वे येथून विरेंद्र जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा - गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा

यासोबतच तिवसा- यशोमती ठाकूर, आर्वी-अमर काळे, सावनेर- सुनील केदार, ब्रह्मापुरी-विजय वडेट्टीवार, नांदेड उत्तर- डी. पी. सावंत, नायगाव-वसंतराव चव्हाण, कळमनुरी-संतोष टारफे, मालेगाव-आसिफ शेख रशीद, चांदिवली-मोहम्मद आरिफ नसीम खान, धारावी-वर्षा गायकवाड, मुंबादेवी-अमीन पटेल, भोर-संग्राम थोपटे, संगमनेर-बाळासाहेब थोरात, लातूर शहर-अमित देशमुख, औसा-बसवराज पाटील, तुळजापूर-मधुकरराव चव्हाण, सोलापूर-प्रणिती शिंदे आणि पलूस कडेगाव या मतदारसंघातून काँग्रेसने माजी नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.

Intro:काँग्रेसच्या पहिल्या यादीत 22 विद्यमान आमदारांना दिली संधी
माणिकराव ठाकरे यांच्या मुलाचा पत्ता कट तर आमदार अमिता चव्हाण यांना वगळून अशोक चव्हाणांना उमेदवारी
mh-mum-01-mahaaghadi-seating-mla-7201153
मुंबई, ता. 29 :
काँग्रेसने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात आपल्या विधानसभेच्या 22 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने यावेळी सावधपणे ही यादी जाहीर करून एकाही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला नाही. मात्र जे उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांच्यापैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या राहुल ठाकरे या मुलाचा पत्ता कट करून त्याठिकाणी काँग्रेसने यवतमाळमधून अनिल मंगरूळकर हा नवीन चेहरा दिला आहे. तर दुसरीकडे भोकरच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्या ठिकाणी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कोल्हापूर दक्षिण येथून मागील निवडणुकीत पराभूत झालेले सतेज उर्फ बंटी पाटील यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने या ठिकाणी त्यांच्या रुतूराज पाटील या नातेवाईकाला उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या यादीत काँग्रेसचे विधीमंडळ नेते, ॲड. के.सी. पाडवी यांना अक्कलकुवा, बुलढाणा येथून हर्षवर्धन सपकाळ, रिसोड-वाशिम येथून अमित झनक यांना तर धामणगाव रेल्वे येथून विरेंद्र जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
यासोबतच तिवसा- यशोमती ठाकूर,आर्वी-अमर काळे,सावनेर- सुनील केदार,ब्रह्मापुरी- विजय वडेट्टीवार, नांदेड उत्तर- डी. पी. सावंत,नायगाव-वसंतराव चव्हाण, कळमनुरी-संतोष टारफे, मालेगाव-आसिफ शेख रशीद,चांदिवली-मोहम्मद आरिफ नसीम खान, धारावी-वर्षा गायकवाड, मुंबादेवी-अमीन पटेल,भोर-संग्राम थोपटे, संगमनेर-बाळासाहेब थोरात, लातूर शहर-अमित देशमुख, औसा-बसवराज पाटील, तुळजापूर-मधुकरराव चव्हाण, सोलापूर-प्रणिती शिंदे आणि पलूस कडेगाव या मतदारसंघातून काँग्रेसने माजी नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.
Body:काँग्रेसच्या पहिल्या यादीत 22 विद्यमान आमदारांना दिली संधीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.