मुंबई - चांदिवली मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आरिफ मोहमद नसीम खान यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या पदयात्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारीही त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवावा, असे आवाहन नसीम खान यांनी केले आहे.
नसीम खान २० वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असून जनतेतूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. लोकांच्या कामाला येणारा आमदार अशी त्यांची ओळख झाली असून पाचव्यांदा विजयी होतील, असा विश्वास स्थानिक लोकांनी बोलून दाखवला.
हेही वाचा - नसीम खान यांचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल
पदयात्रा व चौक सभांवर नसीम खान यांनी जोर दिला असून युती सरकारच्या कारभाराला लोक कंटाळले आहेत. भाजप शिवसेनेच्या जुमलेबाजीचा पर्दाफाश झालेला असून पाच वर्षात त्यांनी काहीही केले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप-शिवसेना सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष असून हा रोषच २१ तारखेला मतदानातून व्यक्त होऊन काँग्रेस आघाडी सरकारला विजयी करेल, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ तंत्र लागू
मंगळवारी सकाळी नसीम खान यांनी पदयात्रेची सुरुवात केली. हजारो लोकांनी या पदयात्रेत भाग घेतला. दर्शन हॉटेलपासून सुरू झालेली पदयात्रेने पुढे होली क्रॉस स्कूल, गांवदेवी, रामदेव पीर मार्ग, मिलिंद नगर, कशीश इमारत, उत्कर्ष स्कूल हा भाग पिंजून काढला