ETV Bharat / state

Congress On BEST बेस्टच्या सुरक्षा अनामत रक्कम वसुलीवरून राजकीय पक्ष आक्रमक, शिवसेनेने केली बिलाची होळी - ग्राहकांना वीज पुरवठा

मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टने ग्राहकांना सुरक्षा अनामत रकमेवरुन ( Security Deposit Amount ) नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राजकीप पक्ष चांगलेच आक्रमक ( Congress And Thackeray Faction Aggressive Against BEST ) झाले आहेत. काँग्रेसने याबाबत अनामत रक्कम वसूल करू नये, यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ( Shiv Sena Thackeray Faction ) यांनी करीरोडला आंदोलन करत बिलाची होळी केली आहे.

Thackeray Faction Aggressive Against BEST
आंदोलन करताना ठाकरे गट
author img

By

Published : Jan 10, 2023, 8:31 PM IST

रवी राजा, महापालिकेचे विरोधी पक्षनेते

मुंबई - बेस्ट उपक्रमाकडून मुंबई शहरातील १० लाख ५० हजार वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या ग्राहकांना दोन महिन्यात येईल, इतके बील सुरक्षा अनामत रक्कम ( Security Deposit Amount ) म्हणून भरण्याच्या नोटीस ( Congress And Thackeray Faction Aggressive Against BEST ) पाठवल्या आहेत. यावरून काँग्रेस आणि शिवसेनेने ( Shiv Sena Thackeray Faction ) अशी अनामत रक्कम वसूल करू नये, असे बेस्ट महाव्यस्थापकांना पत्र दिले आहे. तर बेस्टने एमईआरसीच्या ( BEST Notice To people ) आदेशाने ही रक्कम वसूल केली जात असल्याने सांगितले आहे. यावरून राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने आज या बिलांची होळी केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात हा वाद आणखी चिघळणार आहे.

ग्राहकांवर अन्याय बेस्ट उपक्रमाने २०१२ - १३ मध्ये आपल्या ग्राहकांकडून परिवहन उपक्रमाला होणारा तोटा वीज विभागाच्या ग्राहकांकडून वसूल ( Thackeray Faction Aggressive Against BEST ) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बेस्टने सुमारे ३ हजार कोटी रुपये टीडीएलआर जमा केला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असताना बेस्टने आपल्या ग्राहकांना एक पत्र पाठवले आहे. त्यात दोन महिन्याचे बिल सुरक्षा अनामत म्हणून भरावे असे म्हटले आहे. आपल्याकडे वीज कायदा आहे. २०२१ मध्ये बेस्टने एस ओ पी काढल्या आहेत. त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनी केली जात आहे, हे अन्यायकारक आहे असे पालिकेतील

काँग्रेसचा इशारा मुंबईत गेले २ वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे अनेकजण ही रक्कम भरू शकत नाही. मुंबईत बेस्ट सोबत अदानी आणि एमएसईबी या कंपन्याही वीज पुरवठा करतात. त्यांनी असे पत्रक काढलेले नाही. बेस्टने काढलेले पत्रक ग्राहकांवर अन्याय करणारे असल्याने ते रद्द करावे अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. हे पत्रक रद्द केले नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.

शिवसेनेकडून बिलांची होळी बेस्टच्या ग्राहकांकडून सुरक्षा अनामत रक्कम ( Security Deposit Amount ) घेऊ नये यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन सुरक्षा अनामत रक्कम घेऊ नये अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी करीरोड नाका येथे जनआक्रोश आंदोलन केले आहे. ही जुलमी वाढ रद्द करावी अशी मागणी करत यावेळी बेस्टच्या बिलांची होळी करण्यात आली आहे.

नियमानुसार वसुली बेस्टच्या ग्राहकांकडून सुरक्षा अनामत रक्कम एमईआरसीच्या आदेशाने वसूल करत आहे. अशीच वसुली अदानी इलेक्ट्रिसिटी, राज्य सरकारची एमएसईबी या विद्युत कंपन्या वसूल करत आहेत. बेस्टचे १० लाख ५० हजार ग्राहक आहेत. यापैकी ज्या ग्राहकांची अनामत रक्कम दोन महिन्याच्या बिलाच्या रकमेपेक्षा कमी आहे, अशा सर्वच ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.