ETV Bharat / state

'शिवस्मारकाच्या घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार' - अरबी समुद्र

अरबी समुद्रात उभे राहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यासंदर्भातील अनेक पुरावे देवूनही सरकार त्याची दखल घेत नसल्याने केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आज काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना
author img

By

Published : Sep 30, 2019, 5:21 PM IST

Updated : Sep 30, 2019, 5:57 PM IST

मुंबई - अरबी समुद्रात उभे राहत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यासंदर्भातील अनेक पुरावे देवूनही सरकार त्याची दखल घेत नाही. म्हणून या विषयी आम्ही केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा, आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगानेही जर या विषयी दखल घेतली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असाही, इशारा आज (सोमवार) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या संयुक्त परिषद पत्रकार परिषदेत देण्यात आला.

बोलताना, सचिन सावंत

मलिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार आहे. हा सर्व भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने झाल्याचा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट - २ येतोय, असे सांगितले होते. त्याची आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.

हेही वाचा - गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; त्यांनी बारामतीतून लढावे - मुख्यमंत्री

मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो, असे सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तरही दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही. उलट शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल केल्याने शिवस्मारक घोटाळा बाजुला गेला, असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा - 'संभाजी भिडे यांनी या वयात बालिश वक्तव्य करू नये'

शिवस्मारकाचे अध्यक्ष विनायक मेटे आणि वर्षभरापूर्वी याच निविदा प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे एक तक्रार सरकारला दिला होता. परंतु, त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी सरकारकडून करण्यात आली नाही, असे सांगत सावंत याने मेटे यांनी दिलेले पत्र वाचून दाखवले.

हेही वाचा - गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा

दरम्यान, मुकुल रोहतगी यांची व व्ही. एन. खरे यांची वकील कंपनी यांच्याकडून लॉ अॅण्ड ज्युडीशियलला बायपास करण्यात आले आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात लॉ अॅण्ड ज्युडीशियल कशासाठी ठेवले आहे, असा सवालही नवाब मलिक यांनी केला. दोन लिगल ओपिनियनमध्ये शब्द ना शब्द एकच आहे. म्हणजे सुरुवातीपासून एल अ‍ॅण्ड टीला टेंडर द्यायचे ठरले होते, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

हेही वाचा - आदित्य ठाकरे 3 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज?

Intro:

शिवस्मारकाच्या घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत इशारा

mh-mum-01-ncp-cong-joint-pc-7201153
(यासाठी लाईव्ह फ्रेम देण्यात आला होता)

मुंबई, ता. ३० :

अरबी समुद्रात उभे राहत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या शिवस्मारकामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला त्यासंदर्भातील अनेक पुरावे देवणे सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून या विषयी आम्ही केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने ही जर या विषयी दखल घेतली नाही तर आम्ही नयायलायाचा दरवाजा ठोठावू असाही ईशा रा आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कडून घेण्यात आलेल्या संयुक्त परिषद पत्रकार परिषदेत देण्यात आला.
शिवस्मारकासाठी सुरुवातीला ३ हजार ८२६ कोटीचे टेंडर असताना लोयेस्ट टेंडर काढण्यात आले. ही किंमत २६९२ कोटी करण्यात आली. एल अ‍ॅण्ड टी २५०० कोटीत कमी करतो सांगितले. ४२ टक्क्याने टेंडर भरतो असं दाखवायचं आणि १२०० कोटीने कमी करण्यात आले असे दाखवण्यात आले. परंतु वस्तुस्थिती वेगळी असून तब्बल 40 टक्‍क्‍यांहून अधिक फायदा म कंपनीला करून देण्यात आल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या टेंडर साठी राज्य सरकारकडून विधी व न्याय विभागाचा आणि अॅटरणे जनरल चा सल्ला न घेता न घेता, l&t कंपनी चे वकीलपत्र घेणाऱ्या कंपनीचा सल्ला घेतला, त्यासाठी ८० कोटी रुपये देण्यात आले, हे कोण दिले, त्याचे बिल अजून समोर आणले जात नाही याविषयी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी.मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

मलिक म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागणार आहे.हा सर्व भ्रष्टाचार मुख्यमंत्री यांच्या आशिर्वादाने झाल्याचा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट - २ येतोय असं सांगितलं होते त्याची आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.

मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो असं सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तरही दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही.उलट पवारसाहेब यांच्यावर ईडीचा गुन्हा दाखल हा विषय पुढे सोडला आणि शिवस्मारक घोटाळा बाजुला गेला असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यातील हे घोटाळेबाज सरकार असून स्मारकातही घोटाळे करत आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारकडून त्यांच्याच स्मारकामध्ये भ्रष्टाचार करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुळात हे टेंडर ३ हजार ८२६ कोटीचे टेंडर असताना लोयेस्ट टेंडर काढण्यात आले. ही किंमत २६९२ कोटी करण्यात आली. एल अ‍ॅण्ड टी २५०० कोटीत कमी करतो सांगितले. ४२ टक्क्याने टेंडर भरतो असं दाखवायचं आणि १२०० कोटीने कमी करण्यात आले असे दाखवण्यात आले. हा डिझाईन करुन भ्रष्टाचार करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या अध्यक्ष विनायक मेटे आणि वर्षभरापूर्वी याच टेंडर प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे एक तक्रार सरकारला दिली होती परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी सरकारकडून करण्यात आली नाही असे सांगत सावंत याने मेटे यांनी दिलेले पत्र वाचून दाखवले.
दरम्यान, मुकुल रोहतगी यांची व व्ही. एन. खरे नामवंत वकील यांची कंपनी आहे. यांच्याकडून लॉ अॅण्ड ज्युडीसियलला बायपास करण्यात आले आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात लॉ अॅण्ड ज्युडीसियल कशासाठी ठेवले आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला. दोन लिगल ओपिनियनमध्ये शब्द ना शब्द एकच आहे.म्हणजे सुरुवातीपासून ठरवून एल अ‍ॅण्ड टी ला टेंडर द्यायचे ठरले होते असा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Body:शिवस्मारकाच्या घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणारConclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.