मुंबई - डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरांना अटक करा, या मागणीसाठी नायर हॉस्पिटलच्या बाहेर मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या घटनेचा निषेध करत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी या केसमधील इन्चार्ज मुंबई पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. या केसच्या संदर्भात फास्टट्रॅक मध्ये निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी देवरा यांनी केली. तसेच, नायर रुग्णालयाच्या प्रशासनाला अर्ज देखील केला. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात कारवाई न झाल्यास काँग्रेस आपली भूमिका घेईल, असे देवरा म्हणाले.