मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ( Eknath Shinde Devendra Fadnavis Govt ) 22 हजार कोटींचा टाटा-एअरबस सी-295 वाहतूक विमान प्रकल्प गमावला ( Tata Airbus C295 transport aircraft project ) आहे. हा प्रकल्प आता गुजरात सरकारकडे सोपवण्यात आला आहे. टाटा-एअरबस सी प्रक्लप गुजरातमध्ये ( Tata Airbus C venture in Gujarat ) जाण्याच्या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प शेजारच्या राज्यात का हलवण्यात आला, असा सवाल करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सडकून टीका केली. शिंदे सरकार राज्याच्या प्रगतीबाबत गंभीर नसल्याचा आरोप आदित्य यांनी केला. तसेच हे सरकार राज्याच्या हिताचे रक्षण करण्यात अपयशी असल्याची टीका त्यांनी केली.
काय आहे एअरबस प्रकल्प? गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी गुजरातला मोठी भेट मिळाली आहे. C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती वडोदरात होणार आहे. हा प्रकल्प 'मेक इन इंडिया' देशांतर्गत विमान निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (IAF) वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,000 कोटी आहे.
8 सप्टेंबर 2021 ला झाला होता करार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे होणाऱ्या समारंभात उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने 08 सप्टेंबर 2021 रोजी M/s Airbus Defence and Space SA, स्पेन कडून 56 C-295 MW वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. 24 सप्टेंबर 2021 रोजी, संरक्षण मंत्रालयाने मेसर्स एअरबस डिफेन्स, स्पेस SA यांच्याशी संबंधित उपकरणांसह विमानाच्या संपादनासाठी करार केला.
संरक्षण सचिवांनी दिली संपूर्ण माहिती - संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती देतांना सांगितले की, "सी-२९५ विमानांची निर्मिती युरोपबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकल्पाअंतर्गत एका खाजगी कंपनीद्वारे लष्करी विमान भारतात तयार केले जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹२१,९३५ कोटी आहे. विमानाचा वापर नागरी कारणांसाठीही केला जाऊ शकतो." या प्रकल्पाद्वारे हवाई दलाला एअरबस कंपनी सी-295 ची 56 मध्यम-लिफ्ट लष्करी वाहतूक विमाने मिळतील, त्यापैकी 16 विमाने थेट एअरबसकडून खरेदी केली जातील, उर्वरित 40 टाटाअॅडव्हान्ससह भारतात बांधली जातील.
विमानाची वैशिष्ट्ये - C-295 विमान सुमारे 6 टन पेलोड वाहून नेऊ शकते. तसेच सुमारे 11 तास उड्डाण करू शकते. एअरबस कंपनीच्या म्हणण्यानुसार, C295 विमान युद्धभूमीवर एकाच वेळी 71 सैनिक किंवा 50 पॅराट्रूपर्स वाहून नेण्यास सक्षम आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेली मध्यम वजनाची Avro विमाने खूप जुनी आहेत, त्यांची जागा C-295 विमानांनी घेतली जाईल.
एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांची टीका - राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ ( Vedanta Foxconn Project ) आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला ( Airbus project to Gujarat ) गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली ( Aditya Thackeray criticized the rulers ) आहे. ते म्हणाले की, आम्ही सातत्याने या घटना बाह्य सरकारला सांगत होतो की, एअर बस हा प्रकल्प राज्यातून निघून जाईल.
राज्यात बेरोजगार नाही का? - राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ ( Vedanta Foxconn Project ) आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला ( Airbus project to Gujarat ) गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली ( Aditya Thackeray criticized the rulers ) आहे. ते म्हणाले की, आम्ही सातत्याने या घटना बाह्य सरकारला सांगत होतो की, धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. मला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, राज्यात तरुण हुशार बेरोजगार नाही का? ज्यांना रोजगार पाहिजे. देशभरातील जे तरुण कामाच्या निमित्ताने आशेवर येणार आहे. त्यांचा काय होणार? हा चौथा प्रकल्प आहे जो राज्यातून निघून गेला आहे. याचा उत्तर कधीना कधी द्यावाच लागणार आहे असे, यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल आहे.