ETV Bharat / state

Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी महाविकास आघाडीच्या निर्णयबाबात संभ्रम - Congress chief spokesperson Atul Londhe

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Legislative Council elections) जाहीर झाली आहे. या निवडणूका लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढायच्या की स्वतंत्रपणे लढायच्या याबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्याप संभ्रम (Confusion about Maha Vikas Aghadi decision) असल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली. 30 जानेवारी 2023 ला निवडणूकीचे मतदान होणार आहे.

Legislative Council elections
Legislative Council elections
author img

By

Published : Dec 31, 2022, 9:12 PM IST

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे बोलताना

मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Legislative Council elections) जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्जांची मुदत : महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्यसंख्या ही 78 आहे. त्यामध्ये आता पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यामध्ये आता सामना पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामध्ये नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ अशी ही निवडणूक असणार आहे. सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार होते. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजीत पाटील हे आमदार होते. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे आमदार होते. तर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये नागो गाणार हे आमदार होते.

निवडणूका आघाडीच्या माध्यमातून लढणार : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात होणाऱ्य़ा निवडणुकांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडी म्हणून लढणार आहे. अमरावती.औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या जागा आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून लढणार असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Congress chief spokesperson Atul Londhe) यांनी सांगितले. तसेच या सर्व जागा आघाडी निश्चितच जिंकणार असा दावाही लोंढे यांनी केला आहे.

आघाडीचा अद्याप निर्णय नाही : दरम्यान, कॉंग्रेसची नाशिकची जागा आणि राष्ट्रवादीची औरंगाबादची जागा यंदा कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे लढवायची याबाबत अद्यार निर्णय घेतला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.