मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. सत्ता संघर्षाचा वाद न्यायप्रविष्ठ असतानाच निवडणूक आयोगाने निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेनेच्या शाखा आणि कार्यालयावर शिंदे गटाकडून दावा केला जात असताना अवघ्या शिवसैनिकांचे दैवत असलेल्या शिवसेना भवनावर वक्रदृष्टी पडली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तकडे तक्रार दाखल केली आहे. ठाकरेंची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी केलेले हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अडीच वर्षाचा सत्ताकाळ गेला : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. हा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत राज्यात सत्तेवर आले. हातातोंडाशी असलेली सत्ता गमावणे भाजपच्या जिव्हारी लागले होते. ठाकरे यांच्या बदला घेण्यासाठी भाजपने अनेक रणनीती आखल्याचे बोलले जाते. अडीच वर्षाचा सत्ताकाळ गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार केले. शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना आमची असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
सेनेच्या शाखा आणि कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली : शिंदे गटाच्या आमदारांचे आणि सत्तांतराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. निवडणूक आयोगाने याबाबत नुकताच शिवसेना कोणाची यावर निकाल देताना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटात जात असताना निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, शिंदे गटाकडून सेनेच्या शाखा आणि कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवाई ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट : अनेक कार्यालय पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवाई नावाने आहेत. त्यात शिवसैनिकांचे दैवत असलेले शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावाने आहे. शिवसेना भवन ताब्यात घेणार नाही, अशी ग्वाही शिंदे गटाकडून देण्यात आली होती. मात्र, आता शिवाय ट्रस्ट विरोधात सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाई ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या राजकीय पक्षाला वापरायला कशी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजप शिंदे गटाने ताकद लावल्याचे बोलले जाते.
राजकीय पक्षाचे कार्यालय ताब्यात : शिवसेना भवनची जागा कोणाच्या नावावर आहे. त्याबाबत सर्व माहिती गोपनीय होती. याबाबत सध्या शिवाय ट्रस्टची जागा असल्याचे समोर आले आहे. एखाद्या ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही मग राजकीय पक्ष वाला ही वास्तू कशी वापरू दिली. परवानगी नसताना राजकीय पक्षाचे कार्यालय इतक्या दिवस का वापरण्यात आले, असा प्रश्न योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारी उपस्थित केला आहे. तसेच यावर कारवाई करा अन्यथा नुकसान भरपाई विश्वस्तांकडून वसूल करा असे देशपांडे आणि म्हटल आहे.
हेही वाचा : मला विमानातून खाली उतरवले, आता तेच सत्तेच्या खर्चीवरून खाली उतरले; कोश्यारी ठाकरेंवर बरसले