मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात बिकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या सभेत चौकीदार चोर आहे, या घोषणे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन तर्फे करण्यात आली आहे.
या तक्रारीत चौकीदाराला चोर म्हटल्याने सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी माफी मागावी, अशी तक्रारीत मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, बीकेसी पोलीसांनी तक्रारीची नोंद घेतली आहे. याप्रकरणी पोलीस चाचपणी करत असून अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.
भाजप पक्षावर तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेस पक्षाकडुन 'चौकीदार चोर है' या घोषणेचा वापर केला जातो. परंतु, या प्रकरणामुळे राहुल गांधीवर आता गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरले.