मुंबई - दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीतील ( Slum Area In Mumbai City ) सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृहात कम्युनिटी वॉशिंग मशीन योजना ( Community Washing Machine In Slum Area ) राबवली जाणार आहे. अंघोळ, कपडे धुण्याबरोबरच पाण्याचा पुनर्वापर ( Save Water In Community Washing Machine ) केला जाणार आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
झोपडपट्टीत घाणीचे साम्राज्य मुंबईसह उपनगरातील दहिसरच्या गणपत पाटील नगरापासून वांद्रे, जोगेश्वरी, भांडुप रमाबाई नगर, तुळशेत पाडा, तानाजी वाडी, विक्रोळी टागोर नगर ,पूर्व द्रुत गती महामार्ग, कुर्ला, गोवंडी, बैंगणवाडी शिवाजी नगर, चेंबूर वडाळा, बरकत अली नका, शिवडी, रे रोड, कुलाबा आदी सर्व ठिकाणी मोठया प्रमाणावर झोपडपट्टी ( Rush In Slum Area At Mumbai ) दाटीवाटीने वसल्या आहेत. येथे अस्वच्छता पाचवीलाच पुजलेली आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच सांडपाणी आणि मलनि:सारणाची व्यवस्था नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून येते. अनेकदा कपडे धुतल्यानंतर उघड्यावर पाणी टाकले जाते. घाणीच्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार आणि नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
नागरिकांना मिळणार या सुविधा मुंबईची लोकसंख्या ( Mumbai Population ) दीड कोटीच्या घरात पोहोचली असून, मुंबई दर्शनासाठी रोज हजारो पर्यटक मुंबईत येत असतात. मुंबईत खास करून महिलांची अपुऱ्या स्वच्छता गृहांमुळे गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्यांमध्ये कम्युनिटी वॉशिंग मशीन योजना राबवली जाणार आहे. स्वच्छतागृहांत आंघोळीच्या सुविधेसोबतच कपडे धुण्यासाठीची, तसेच उपकरणे चार्जिंगची सुविधा असणार आहे. विशेष म्हणजे एकदा वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाणार आहे. वर्षाला ९० लाख लिटर शुद्ध पाण्याची यामुळे बचत होणार आहे. पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी हे पाणी उपयोगात आणण्याचा महापालिकेचा मानस आहे.
पाण्यासाठी आकारले जाणार फक्त एक रुपया शुल्क या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी फक्त एक रुपया शुल्क आकारले जातील. परिसरातील नागरिकांना यासाठी १५० रुपयात कौटुंबिक मासिक पास असेल. कुटुंबातील ५ व्यक्तींना फायदा होईल. लहान मुलांना मोफत प्रवेश असेल. मात्र कपडे धुण्यासाठी अत्यंत माफक दर आकारले जातील. मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) एका कंपनीच्या 'सामाजिक उत्तरदायित्व निधी'मधून हे काम करणार असून त्यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या सहा महिन्यात मुंबईत ३५ स्वच्छतागृह ( Community Washing Machine Toilet ) बांधून उभी राहतील, असे महापालिकेच्या एसडब्ल्यूएम प्रकल्पाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.
पैसे द्या आणि वापरा या धर्तीवर कम्युनिटी वॉशिंग मशीन योजना झोपडपट्टीतील जनतेकडून पैसे द्या आणि वापरा या धर्तीवर कम्युनिटी वॉशिंग मशीन योजना आणली आहे. हा चांगला उपक्रम आहे. नागरिकांना वीज आणि पाण्यासाठी व्यावसायिक दर आकारला जातो. त्याऐवजी घरगुती दर आकारले जावेत. रुग्णालय किंवा सार्वजनिक ठिकाणी जे दर आकारले जातात, ते कमी करायला हवेत. समान्यांना सेवा देत असतील, तर कमी दराने सेवा द्यायला हव्यात. नवीन यात काही नाही, मात्र व्यापकता वाढत असेल, तर अधिक चांगले आहे, असे पाणी हक्क समन्वय समितीचे ( Water Rights Coordinating Committee ) सिताराम शेलार यांनी सांगितले.