मुंबई : माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. काहींना एसटी, बस, रेल्वे तिकीटाचा तर काही जण वेगवेगळा छंद जोपासत असतात. डिजिटल करन्सीच्या जमान्यात कोणी जुन्या नाण्यांचा संग्रह करत असेल यावर विश्वास बसत नाही ना? पण हे खर आहे. युसुफ सिद्दीकी लाला हे जुन्या नाण्याचा वडिलोपार्जित संग्रह आजही जपत आहेत. उदरनिर्वाह देखील यातून ते करत असून नोट बंदीच्या काळात बंद केलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटाही या संग्रहात दिसून ( Coin Collecting Hobby ) आहेत.
नाणी नोटा उदरनिर्वाहचे साधन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर अगदी हाकेच्या अंतरावर युसूफ सिद्दीकी लाला यांचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात संपूर्ण जगातील देशांतील नाणी पाहायला मिळतात. तसेच मुघलकालीन नाणी, शिवकालीन मोहरा, ब्रिटिशांची करंसी, काळानुसार भारतात बदलत गेलेली सर्व नाणी, नोटा, विदेशातील नाणी व नोटा विशेष म्हणजे विदेशातील इतक्या जुन्या नोटा असून सुद्धा त्या फाटत नाहीत, भिजत नाहीत. चांदी, तांबे, पितळ, तसेच इतर धातूपासून तयार झालेले नाणी इथे आहेत. युसूफ यांच्या वडिलांना नाणी व नोटा गोळा करण्याची आवड होती. सुरुवातीला त्यांनाही आवड जपली. मात्र, पुढे हीच नाणी आणि नोटा त्यांच्या उदरनिर्वाहचा साधन बनले ( Coins And Note Collection Means of Livelihood )आहेत.
120 पेक्षा जास्त देशांच्या नोटा संग्रहीत : सध्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत मोहोत्सव सुरु आहे. त्यानिमित्ताने बजारपेठेत आणलेल्या नाण्यांचे विशेष संग्रह सुद्धा केला आहे. भारतातील शंभर रुपयांची सगळ्यात जूनी नोट सुद्धा त्यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे 120 पेक्षा जास्त देशांच्या नोटा त्यांच्याकडे ( Collect More Than 120 Countries Bank notes ) आहे. 10 रुपये ते 10 लाख इतक्या किमतीत विकली जाणारी नाणी युसुफ यांचेकडे उपलब्ध असल्याचे ते सांगतात. तसेच आता चलनात नसलेली नाणी, नोटा, परदेशी डॉलर, युरो अनेक जण त्यांच्याकडे येऊन नाणी देतात. तर ज्यांना नाणी गोळा करण्याची आवडत आहे ते सुद्धा इथून नाणी नोटा विकत घेतात. त्यासाठी लाला यांना आर्थिक मोबदला मिळतो.