ETV Bharat / state

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील कोणतीही परीक्षा रद्द नाही - उदय सामंत - महाविद्यालयाच्या परिक्षा रद्द

विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षा घेण्यासाठी आम्ही चार कुलगुरू आणि दोन संचालकांची समिती नेमली असून या परीक्षा कशा घ्यायच्या यासंदर्भात ही समिती उपायोजना करणार आहे.

uday samant
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Apr 13, 2020, 2:43 PM IST

मुंबई - राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील कोणतीही परीक्षा रद्द करण्यात आली नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावीच्या भुगोलचा पेपर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील परीक्षा रद्द झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे राज्यात मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज घेतली. यातील कोणती परीक्षा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षा घेण्यासाठी आम्ही चार कुलगुरू आणि दोन संचालकांची समिती नेमली असून या परीक्षा कशा घ्यायच्या यासंदर्भात ही समिती उपायोजना करणार आहे. त्यानंतर राज्यपाल महोदय यावरील अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतरच या संदर्भातील माहिती आम्ही पालकांनी विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यामुळे तूर्तास परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यात कोरोनाचे संकट अद्यापही ही कमी झालेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात जर आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील परीक्षा कशा घ्यायच्या यावर विचार होऊ शकतो. त्यासाठी काही ऑनलाईन पर्याय देता येतील का यासाठीचा फॉरमॅट आमच्याकडे अद्याप बनला नसला तरी त्यावर भविष्यात विचार करता येऊ शकेल असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.