मुंबई : सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद काही थांबताना दिसत नाही. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुहाटीला जाऊन 50 खोके घेण्याचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध करावा याबाबतचे पुरावे सादर करावेत, अन्यथा आपण कायदेशीर उत्तर देऊ असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले आहे. दोन्ही आमदारांमधला वाद पाहता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांना वाद (dispute between Ravi Rana and Bachhu Kadu) मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बोलवले आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन्ही आमदारांना एकत्रितरित्या वर्षा निवासस्थानी बोलून या वादावर मध्यस्थी करून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde will mediate) तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मध्यस्थी करण्याचा प्रयत्न : आमदार रवी राणा यांनी केलेला आरोप हा केवळ आपल्यापुरता मर्यादित नसून हा आरोप बंडखोरी करणाऱ्या सर्व चाळीस आमदारांवर केला आहे. तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे रवी राणा यांनी आपल्या आरोपाबाबतचे पुरावे सादर करावे, असे आव्हान रवी राणा यांना दिले होते. सत्ताधारी पक्षातील आमदारांमधला वाढत जाणारा वाद पाहता आता यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्हीही समर्थक आमदारांना फोन करून सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. एकमेकांच्या विरोधात वक्तव्य न करण्याचा देखील सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत.
बच्चू कडू काय म्हणाले ? आमदार रवी राणा यांनी माझ्या विरोधात जे बिन बुडाचे आरोप केले आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी शनिवारी नोटीस बजावणार आहे. मी गुवाहाटी ला जाऊन पैसे घेतले असेल. तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे. असे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. गुवाहाटीला जाऊन मी पैसे खाल्ल्याचा आरोप करणारे आमदार रवी राणा यांनी माझ्या विरोधातील आरोप एक नोव्हेंबरपर्यंत सादर करावे. त्यानंतर 1 नोव्हेंबरला अमरावती शहरातील महापालिकेच्या टाऊन हॉल येथे राज्यभरातील प्रहारचे हजारो कार्यकर्ते एकत्र येतील. असे ते म्हणाले.
वाद चिघळला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला निश्चितच स्थान मिळेल अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दोघांनाही होती. मंत्रिमंडळात सहभागी होऊन अमरावतीचे पालकमंत्री पद भाऊंना मिळेल असा ठाम विश्वास दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, या दोन्ही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे यासाठी दोघांनीही एकमेकांना जबाबदार धरल्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद चिघळला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती पैसा दिला हे स्पष्ट करावे - आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुहाटी जाण्यासाठी 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांनी केलेला आरोप त्वरित सिद्ध करावा किंवा याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती पैसा दिला हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिल्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात याच वादाची चर्चा सुरू आहे.
बच्चू कडूंचे रविवारी अमरावती शक्ती प्रदर्शन - आमदार रवी राणा यांनी माझ्यावर भिन बुडाचे आरोप केले आहेत. यासह माझ्याविरुद्ध पोलिसांत खोटी तक्रार दिली असून मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून किती पैसे घेतले हे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. असे आव्हान देत आमदार बच्चू कडू हे अमरावतीत आपल्या प्रहार संघटनेचे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासह त्यांनी आमदार रवी राणा त्यांना मला भेटायला अमरावती शहरातील टाऊन हॉल येथे एकट्याने यावे असे आव्हान दिले आहे. सध्या अमरावतीत आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना तसेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांना धडा शिकवण्यास सज्ज झाले आहेत.