ETV Bharat / state

रामराव महाराज निधन : समाजाचे अध्यात्मिक मार्गदर्शक छत्र हरपले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराजांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

CM uddhav thackrey
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 31, 2020, 3:24 PM IST

मुंबई - बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की बंजारा समाजाचे श्रद्धास्थान, धर्मगुरू डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. डॉ. रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्याच्या विकासासाठी व्हावा, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रद्धास्थान, धर्मगुरु म्हणून त्यांचा अनुयायांना मोठा आधार होता. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मासह, समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

कोण होते डॉ. रामराव महाराज -
संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बंजारा समाजाचे धर्मगुरू रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 ला पोहरादेवी येथे झाला. 1948 मध्ये पोहरादेवी येथील परशराम महाराजांचे निधन झाल्यावर वयाच्या 14 व्या वर्षी ते गादीवर बसले. परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी रामरावबापू महाराजांना उत्तराधिकारी म्हणून गादीवर बसविले. 12 वर्षे अनुष्ठान व 12 वर्षे मौन धारण केल्यानंतर बापू यांनी देश भ्रमणास सुरूवात केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.