ETV Bharat / state

'...तर मी मुख्यमंत्री झालो नसतो', विधान परिषदेवर जाण्याचेही दिले संकेत - cm thackrey saamna interview

सामना दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी आणि नंतर घडलेल्या सर्व घडामोडीवर चर्चा केली.

cm uddhav thackrey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:45 AM IST

Updated : Feb 3, 2020, 3:24 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटीप्रमाणे सर्व काही झाले असते, तर आज मी मुख्यमंत्री झालो नसतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच आगामी काळात विधानपरिषेदवर जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. सामना दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी आणि नंतर घडलेल्या सर्व घडामोडीवर त्यांनी चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या दैनिकाला दिलेली मुलाखत

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्रिपद स्वीकारणे हा माझ्यासाठी धक्का नाही. हे माझे स्वप्न नव्हते. मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचे ठरवले होते. माझे मुख्यमंत्रिपद हे वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. त्या दिशेने पाऊल टाकताना कोणत्याही थराला जाईल आणि वचन पूर्ण करेन, असे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी सत्तेसाठी कोणतेही पद स्वीकारले नाही. माझीही तशी इच्छा नव्हती. मात्र, जेव्हा माझ्या लक्षात आले की त्यांच्यासोबत राहून ते शक्य नाही. म्हणून माझा नाईलाज झाला.

मी त्यांना आकाशातील चांद-तारे नाही मागितले. लोकसभेच्या निवडणुकीआधी जे ठरले होते, तेच मागितले होते. मात्र, भाजपने अडीच-अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन तोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. वचन तोडल्यानंतर भाजपबद्दल राग आहे. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यावर भाजप धक्क्यातून सावरला आहे की नाही माहीत नाही. हे क्षेत्र असे आहे की यात धक्के हे गृहीत धरून चालायचे. मी घडवणारा आहे. बिघडवणारा नाही. ज्यांचे काही बिघडले ते या परिस्थितीला स्वत: जबाबदार आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

हेही वाचा - 'छत्रपती शिवरायांनी पाहिलेलं स्वप्न लवकरच होणार पूर्ण'

विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागावाटपावरून वाद झाले. मात्र, हिंदूत्वासाठी तुम्ही युती टिकवली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोंदीनी लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांचा मोठे भाऊ म्हणून उल्लेख केला होता. मात्र, हे नाते दोन्ही बाजूने टिकवले गेले नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना-भाजप हिंदूत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले. या हिंदूत्वात वचनाला महत्त्व आहे. वचन मोडले जात असेल, तर ते हिंदूत्व स्वीकार करणार नाही, असेही ते म्हणाले. आम्ही आजही आमच्या हिंदूत्वाच्या मुद्यावर ठाम आहोत.

मी येईन असे कधी बोललो नव्हतो, मी येईन हे जनतेलाही वाटले नव्हते, स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, जनता आपल्याला बघत असते. देशात अनेक राज्य आहेत. मात्र, राज्यातील मुख्यमंत्रिपद हे छत्रपती शिवरायांच्या राज्याचे पद आहे आणि हे त्याच शक्तीचे आशीर्वाद आहेत. येत्या 2 ते 4 महिन्यात निवडणूक लढण्याबाबतीत निर्णय घेणार आहे. मी मुख्यमंत्री होण्याआधी त्या इमारतीत 2-4 वेळा गेलो होतो. मात्र, सभागृहात मुख्यमंत्री म्हणूनच गेलो. यावेळी आगामी काळात विधान परिषदेत जाण्याचेही त्यांनी संकेत दिले.

हेही वाचा - केंद्रीय अर्थसंकल्पात दिसली मोदींच्या राजकीय उद्देशाची झलक..

मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी ठाकरे यांनी तत्त्व सोडली आणि हिंदूत्त्वाशी तडजोड केली, असा आरोप केला गेला. यावर मी धर्मांतर केले नाही, तर तुम्ही म्हणाल तेच हिंदूत्व नाही, तुम्ही म्हणणार तेच खरे, हा दावा हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले.

भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र आले, असे म्हटले जात आहे. यावर केंद्रातील सरकारमध्ये अनेक विचारधारेचे पक्ष सहभागी झाले आहेत, असा दाखलाही त्यांनी दिला. तर तिन्ही पक्षांची विचारधारा राज्याच्या हितापेक्षा वेगळी नसल्याचेही ते म्हणाले. हे सरकार अनैतिक आहे, असा आरोप केला जातो. त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांसाठी मोदींनी जाऊन प्रचार केला. त्यामुळे त्यांनी नैतिकता शिकवू नये, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून सर्व अनुभव वेगळे वाटले. सत्तेची खुर्ची माझ्यासाठी नवीन असली, तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. मी बाळासाहेंबासोबत हे जवळून पाहिले आहे.

पुढे ते म्हणाले, मंत्रालयातील संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश पाहिल्यावर आजही काम बाकी आहे, अशी भावना मनात आली. तसेच आजोबांच्या काळातील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोलताना ते म्हणाले, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणजे बेळगावसाठी समिती आहे. त्या समितीच्या लोकांची लवकरच भेट घेणार आहे. तसेच त्यासाठी महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांची निवड करण्यात येईल. हे प्रकरण न्यायालयात असूनही कर्नाटक सरकार तेथील मराठी भाषिकांवर भाषिक अत्याचार करत आहेत. तरीदेखील केंद्र सरकार कर्नाटक सरकारची बाजू मांडत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, लवकरच त्याच्यावर कठोर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्ष फोडून भाजपने अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आम्ही त्या पक्षांसोबत हात मिळवणी केली तर काय फरक पडला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही काय गंगाजल घेऊन फिरता का? तर सत्तांतर केलेल्यांना वाल्याचा वाल्मिकी झाला असे म्हणणे वाल्मिकी ऋषिंचा अपमान आहे. कारण वाल्मिकी ऋषींनी तपश्चर्या करून ते वाल्मिकी ऋषी झाले होते, असेही ते म्हणाले. यावेळी बाळासाहेबांचा जन्मदिवस वेगळा वाटला. मातोश्री आणि वर्षा सारखेच वाटते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.