ETV Bharat / state

'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी'

author img

By

Published : Feb 16, 2020, 1:54 PM IST

Updated : Feb 16, 2020, 2:06 PM IST

न्याय सर्वांसाठी समान आहे. तुम्ही राजा असलास तरी न्यायालयात सगळ्यांना सामान न्याय मिळतो. म्हणून यासाठी न्यायदान प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले आहे. नाशिकमध्ये उभारलेली इमारत वाखाणण्याजोगी आहे. मुख्यमंत्री या नात्याने इमारतीला काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत लवकरच राज्यात न्यायमुर्ती घडवण्याचे विद्यापीठ उभारू, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

cm uddhav thackrey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक - शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी तसेच जनता आणि न्यायपालिकेचा सुदृढ संबंधासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय वकील परिषदेला आज (रविवार) सुरूवात झाली. या परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. दोन दिवस ही वकील परिषद चालणार आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय वकील परिषदेला आज (रविवार) सुरूवात झाली.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, न्यायदानाचे कार्य अतिशय महत्वाचे कार्य आहे. न्याय सर्वांसाठी समान आहे. तुम्ही राजा असलास तरी न्यायालयात सगळ्यांना सामान न्याय मिळतो. म्हणून यासाठी न्यायदान प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितलेय. दरम्यान, माझ्यासाठी हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. इतक्या जवळून पहिल्यांदा सरन्यायाधीशांची भेट झाली याचा मला खरोखरच खूप आनंद होत आहे. तसेच आमचे काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, जनता आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून गरज पडल्यास कान पकडा, असे आवाहनही त्यांनी न्यायमुर्तींना केले.

हेही वाचा - 'मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईला'

तसेच जनतेच्या प्रत्येक कामासाठी आम्ही बांधील आहोत. या देशातील मतदार राजा आहे आणि त्याच ऐकणे सरकारचे काम आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. नाशिकमध्ये उभारलेली इमारत वाखाणण्याजोगी आहे. मुख्यमंत्री या नात्याने इमारतीला काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत लवकरच राज्यात न्यायमुर्ती घडवण्याचे विद्यापीठ उभारू, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, यासोबतच अशा इमारतींची गरजच भासणार नाही, असा समाज घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात संस्कार विद्यापीठाची आवश्यकता आहे. यातूनच आपण आदर्शसमाज निश्चितच घडवू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Feb 16, 2020, 2:06 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.