ETV Bharat / state

शिक्षणाच्या आढावा बैठकीत ऑनलाईनचा गाजावाजा; ग्रामीण भागातील वास्तवाकडे दुर्लक्ष - आढावा बैठकीत ऑनलाईन शिक्षणावर चर्चा

शालेय शिक्षण विभागाकडून या बैठकीत जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले. तसेच काही ठराविक विद्यार्थी उभे करून त्यांच्याशी संवादही साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांनादेखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

meeting to discuss about online  school
शिक्षणाच्या आढावा बैठकीत ऑनलाईनचा गाजावाजा
author img

By

Published : Jun 22, 2020, 9:25 PM IST

मुंबई - राज्यातील शालेय शिक्षण आणि त्यासाठीची वस्तुस्थिती याचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले.

शालेय शिक्षण विभागाने सादर केलेल्या एका अहवालात राज्यात ज्यांच्याकडे मोबाईलच नाही, अशांची संख्या ही तब्बल 31. 76 टक्के इतकी आहे. तर, 35 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही उपलब्ध नाही. तब्बल दहा टक्के विद्यार्थ्यांकडे अजूनही टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि ऑनलाईन शिक्षणासाठी इतर कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली होती. त्यावर या बैठकीत दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे एका वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

शालेय शिक्षण विभागाकडून या बैठकीत जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले. तसेच काही ठराविक विद्यार्थी उभे करून त्यांच्याशी संवादही साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांनादेखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावीसाठी स्वतंत्र ५ वाहिन्यांचे नियोजन आहे असे सांगण्यात आले.

दूरदर्शनकडेदेखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा मार्चमधील दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा भुगोलचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र, आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे त्या म्हणाल्या.

९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंगही वेगाने सुरु आहे, अशी माहिती शकुंतला काळे यांनीदिली. दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना -

पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी. तसेच तो सहजरित्या ऑफलाईनदेखील उपलब्ध झाला पाहिजे. गुगल मीटवरील एका ऑनलाईन वर्गाचे आयोजन करताना राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये. तसेच अडचणी आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी. अकरावीची प्रवेश प्रक्रिया मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ऑनलाईन चालणार आहे. इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालाव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.