ETV Bharat / state

Mumbai Rains : मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा - cm uddhav thackeray mumbai rain review

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 9, 2021, 2:15 PM IST

Updated : Jun 9, 2021, 4:58 PM IST

मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना -

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली. मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले आहे. कोविडसह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल? ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू; जनजीवन विस्कळीत

Last Updated : Jun 9, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.