ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरण : गेले काही महिने नेत्यांना आयुष्यातून उठवण्याचे काम सुरू, सत्य समोर आणले जाईल - मुख्यमंत्री - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होत आहे. यावर भाजप नेत्यांकडून शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 13, 2021, 7:42 PM IST

Updated : Feb 13, 2021, 8:10 PM IST

मुंबई - पुण्यातील पूजा चव्हाण या युवतीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी राज्यातील मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावर बोलताना जे सत्य असेल ते समोर आणले जाईल, मात्र गेले काही महिने आयुष्यातून उठवण्याचे काम सुरू आहे, असा टोला भाजपचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवडी ते न्हावाशेवा या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्री मीडियाशी बोलत होते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावर बोलताना, या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईल. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. असाही प्रयत्न होता कमा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये. यामध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनतेसमोर आणले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी घेतली माहिती -

पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात असल्याचे समोर येताच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती.

काय आहे प्रकरण-

पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.

फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी-

या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी -

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी शिवसेनेच्या नेत्याचा संबंध असल्याचे पुढे येत असतानाच, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Last Updated : Feb 13, 2021, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.