मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या वर्षा या निवासस्थानी अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्यात प्रत्येक वर्षी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या गाजावाजा केली जाते. यावेळी मुख्यमंत्री बापाकडे काय मागणी घालतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष असते. शिवाय येथे करण्यात येत असलेली पूजाही ही राज्यातील जनतेचा चर्चेचा विषय असतो. यावेळी महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री राज्याचे प्रधान सचिव यासोबतच विविध पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेला उपस्थिती लावत असतात.
मात्र यंदा पहिल्यांदाच कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणातच आपल्या वर्षा बंगल्यावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी मोजकेच अधिकारी आणि कुटुंबातील सर्व व्यक्ती उपस्थित होत्या. वर्षा बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून यासंदर्भातील कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले.
हेही वाचा - मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणही 'ओव्हरफ्लो', सातपैकी चार धरणे भरल
हेही वाचा - कोरोना संशयिताचा मृत्य झाल्यास ना स्वॅब, ना पोस्टमार्टम; नोंद मात्र कोरोना मृत्यूच्या यादीत