मुंबई - जगभरासह देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत कठोर उपाययोजना करण्याचा निश्चय केला. राज्यांमध्ये आजपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवारी देशभरामध्ये जनता कर्फ्यू झाल्यानंतर आज सकाळी अनेक नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाची साथ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनतेच्या या वागणुकीमुळे अनेक लोकांच्या जीवाचा धोका देखील उत्पन्न झाला आहे. यासाठी सध्या लागू असलेले राज्यातील 144 कलम संचारबंदीमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे