मुंबई - विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- मुख्यमंत्री - राज्यपालांना राज्याचा अभिमान वाटतो. अमृत महोत्सवासाठी शासनाने ५०० कोटी ठेवले आहेत. आरसा बघितला तरी काही लोकांना भ्रष्टाचार झाला असे वाटते.
- जे आमच्या योजनेचा लाभ घेत आहेत त्याचे आशीर्वाद आहेत. माझ्या शस्त्रक्रिया दरम्यान मंत्र्यांनी खूप सांभाळून घेतले.
- सुधीर भाऊ तुम्ही हे राज्य मद्यपी राज्य आहे असे म्हणालात. देशात १ लाख लोकसंख्येच्या मागे सर्वात कमी दारूची दुकाने महाराष्ट्रात आहेत.
- तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात हे योग्य नाही. मला कल्पना आहे.
- रावणाचा जीव हा बेंबीत होता. पण काही जणांना काही भेटत नाही त्यांचा जीव मुंबईत आहे.
- मुंबईत पब्लिक स्कूल चालू केले. महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शाळेच्या बाहेर रांगा लागत आहेत.
- ५०० चौरस फुटाच्या घराना मालमत्तेत पूर्ण सूट दिली आहे. कर्क रोगावर उपचार करणारी देशात पहिली महानगर पालिका मुंबई आहे. कोविडमध्ये ज्यांना द्वेषाची कावीळ झाली त्यांना काहीच करू शकत नाही.
- कोविडमध्ये जंबो कोविड सेंटर उभारले. यापुढे ही करू.
- ज्यांना घरे नव्हती त्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत आहोत. मराठी भाषा भवन, डब्बेवाला भवन, प्रशस्त मत्स्यालय उभारत आहोत.
- मेट्रो कामात पाणी मुरत आहे का बघून घ्या.
- पर्यावरण दृष्टिकरणाने इलेक्ट्रिक बस आणत आहोत.
- रेल्वेची जमीन आहे, पण केंद्रातून सहकार्य भेटत नाही. महाराष्ट्र कर्नाटक वाद अजून मिटत नाही. याबाबत केंद्र सरकार कोणाची बाजू घेते हे सर्वांना माहीत आहे.
- दहिसर भूखंड प्रकरण - दहिसरमध्ये हॉस्पिटल हवे की नको. पण हा वाद आता कोर्टात आहे. महापालिका दर ठरवण्याचे काम करत नाही ते महसूल विभाग करते.
- कोविडमध्ये भ्रष्टाचार, हे मला समजत नाही. पंतप्रधान यांनीसुद्धा प्रशंसा केली. केंद्राने नियमावली बनवली. जीव वाचवणे हीच प्राथमिकता होती. विना टेंडर एकही काम दिले गेले नाही.
- घरच्या म्हातारीचे काळ होण्याचे पाप करू नका
- केंद्रीय यंत्रणा बोगस झाल्या का
- इतकी वर्षे मंत्री म्हणून निवडून येतात
- तेव्हा कुठे गेल्या होत्या यंत्रणा
- ईडी काय घरगडी आहे का?
- ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली होती का
- का नाही मारत दाऊदला
- मेहबूबा मुफ्तींचे वक्तव्ये होते अफजल गुरुला फाशी देवू नका
- मेहबूबा वंदे मातरम म्हणते काय
- विनोद तावडे यांच्या सहीने लांबे याची नियुक्ती
- कुटुंबांची बदनामी करणे XXXपणा
- शिखंडीपणा सोडा
- हिम्मत असेल तर समोर येऊन लढा
- Human laundering सुरु केले आहे का
- संधीचे सोने करायचे की माती ते ठरवा
- मी तुमच्यासोबत येतो मला टाका तुरुंगात
- कंस नाही हे सिद्ध करा...मी कृष्ण नाही
- बाळासाहेबांना तुम्ही काय उत्तर देणार
- शिवसैनिकांना छळू नका
- यंत्रणेचे दलाल आहात की प्रवक्ते
- अघोषित आणीबाणी लागू करण्याच प्रयत्न
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर
- दारूला ३०० टक्के कर होता तो १५० टक्के केला
- दारूच्या बाटल्या लोक दिल्लीवरुन आणायचे
- वाईन विक्री अद्याप सुरू नाही
- राज्यात ४०० ते ५०० मॉल मधे ठेवू
- वाईन ठेवायची सक्ती नाही