ETV Bharat / state

दिलासादायक..! '70 टक्के कोरोनाग्रस्त होतील ठणठणीत'

एकट्या मुंबईत 19 हजार जणांच्या चाचण्या झाल्या, त्यापैकी 1 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, यातून एक दिलासाजनक माहिती अशी आहे की, यापैकी किमान 65 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे दिसून आले आहेत. यामुळे आपण त्यांचा इलाज करून ठणठणीत करू शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 11, 2020, 5:51 PM IST

Updated : Apr 11, 2020, 9:35 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात आज सकाळपर्यंत साधारण 33 हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. एकट्या मुंबईत 19 हजार जणांच्या चाचण्या झाल्या, त्यापैकी 1 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, यातून एक दिलासाजनक माहिती अशी आहे की, यापैकी किमान 65 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे दिसून आले आहेत. यामुळे आपण त्यांचा इलाज करून ठणठणीत करू शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले.

यावेळी त्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणाही केली. ते पुढे म्हणाले, आपण समोरुन रुग्ण येण्याची वाट पाहत नाही. महापालिकेकडून शोधमोहीम राबवून तपासणी करुन घेत आहोत. यामुळे प्रसार वाढण्यापूर्वीच आपण रुग्णांपर्यंत पोहोचत आहोत.

परिसर सील म्हणजे 'क्वारंटाईन'

काही ठिकाणचा परिसर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात येत आहे. पण, सील म्हणजे आपण तो परिसर क्वारंटाईन केल्या सारखेच आहे. हा कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न आहे, अशी माहीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा - धारावीत 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, मृतांचा आकडा 4वर

Last Updated : Apr 11, 2020, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.