ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोट्यधीश; विधानपरिषद निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालमत्तेविषयी माहिती दिली आहे. ठाकरे यांनी वेतन, लाभांश आणि भांडवली नफा हे उत्पन्नाचे साधन दर्शवले असून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी व्यावसायिक भागीदारी, विविध मालमत्तेचे भाडे असे उत्पन्नाचे स्त्रोत नमूद केले आहेत. ठाकरे पती-पत्नीच्या नावे 143 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 12, 2020, 7:29 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्यवसाय काय? त्यांची संपत्ती किती? याविषयी विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आता याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली असून ठाकरे यांच्या नावे 143 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ठाकरे यांनी मालमत्तेविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेतन, लाभांश आणि भांडवली नफा हे उत्पन्नाचे साधन दर्शवले असून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी व्यावसायिक भागीदारी, विविध मालमत्तेचे भाडे असे उत्पन्नाचे स्त्रोत नमूद केले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेत तीन बंगल्याचा समावेश आहे. तर कर्जत येथे त्यांच्या नावे एक फार्म हाऊस आहे. ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नसून त्यांच्या नावे 4 कोटींचे कर्ज देखील आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात त्यांची आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची गुंतवणूक आहे. रायगड जिल्ह्यातील भिलावले आणि कोर्लई येथे एकूण 13 कोटींचे बाजारमूल्य असलेली 10 एकर शेतजमीन आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 76 हजार 922 रुपयांची तर पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 89 हजार 679 रुपयांची रोख रक्कम आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहा बँक खात्यांचे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या पाच बँक खात्यांचे विवरण प्रतिज्ञापत्रात दिले आहे.

रश्मी ठाकरे यांच्या नावावर वांद्रे येथे भूखंड असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावे 76 कोटी 59 लाख57 हजार रुपयांची मालमत्ता आहे तर पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 65 कोटी 9 लाख रुपयांची मालमत्ता आहे. हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीने वारसा हक्काची 1 कोटी 58 हजार रुपयांची मालमत्ताही मुख्यमंत्र्यांकडे आहे. ठाकरे कुटुंबियांची शेअर बाजारातही गुंतवणूक असून उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 कोटी 68 हजार 51 रुपयांचे आघाडीच्या कंपन्यांचे शेअर्स आहेत तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 33 कोटी 79 लक्ष 62 हजार किमतीचे शेअर्स आहेत.

ठाकरे कुटुंबियांकडे सोने, चांदी आणि हिऱयांचे दागिनेही आहेत. त्यांचे बाजारमूल्य अडीच कोटी रुपये आहे. कोणतीही शासकीय थकबाकी त्यांच्या नावावर नाही. आत्तापर्यंतचे सर्व कर त्यांनी भरले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या नावावर 23 गुन्हे दाखल असून त्यापैकी 12 गुन्हे रद्द करण्यात आले आहे. कोणत्याही गुन्ह्यात त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.