मुंबई - राज्य विधीमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरू होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या निमित्ताने विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, शेतकरी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्यंमत्री ठाकरे यांचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. रविवारी (२३ फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची 'सह्याद्री' अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली.
हेही वाचा -खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर
राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होईल. तर सीएएविरोधातील आंदोलनं, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव- भीमा या मुद्द्यांवर सत्ताधारी तसंच विरोधी दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.
हेही वाचा -महाविकास आघाडीत सर्वोच्च नेत्यांचा निर्णय अंतिम - उपमुख्यमंत्री अजित पवार