ETV Bharat / state

मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Feb 26, 2021, 8:30 PM IST

शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याबरोबरच सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'मेयर' या शब्दाला 'महापौर' हा प्रतिशब्द दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मराठी भाषेला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधीमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्यासह इतर मान्यवरांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला होता.

सर्वाेच्च भाषा म्हणून मान्यता मिळावी

मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघु शकत आहोत. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिलेला अग्रलेख 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती. मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे, असा उल्लेख मुख्यमंत्रांनी केला. तसेच शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याबरोबरच सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली.

अभिजात दर्जा मिळायला हवा

ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादातील "मराठी भाषेला अभिजात दर्जा" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजया वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार मांडले. "आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार" या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, बुक गंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, स्टोरी टेल ॲपचे प्रसाद मिरासदार, युनिक फिचर्सचे आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री -

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील फारसी शब्द कमी करून मराठी राजभाषाकोश तयार केला. आपणही मराठी भाषाकोश सोप्या भाषेत का नाही करत? पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगलं तर कोणाची हिंमत आहे न देण्याची.
  • जर्मनी, फ्रान्स, चीन अशा देशांमध्ये मातृभाषेचा अभिमान आढळतो. मातृभाषेतून काही बोलणं, विचार करणं, व्यक्त करणं त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्याला तो कमीपणा वाटतो. आपला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत आपण कितीही आकांत केला तरी मराठी भाषेला अभिजात किंवा आणखी काय दर्जा मिळणार नाही.
  • कोणी करायचं, काय करायचं याचं उत्तर शोधण्याची गरज नाही. आपणच करायचं आहे. 'हॅप्पी मराठी भाषा डे' असे संदेश नाही आले म्हणजे मिळवलं. फक्त भाषा दिनानिमित्त कविता म्हणून, शुभेच्छा देऊन काहीच होणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील.
  • इंग्रजी आली पाहिजे असं सगळे म्हणाहेत. पण ते स्वीकारताना माझी मातृभाषा कमजोर पडता कामा नये. पारतंत्र्यात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख मराठी भाषेच्या पुत्राने, मराठी भाषेतच लिहिला. त्यानंतर सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी टिळकांना तुरुंगात टाकलं. ही ताकद मराठी भाषेत आहे.
  • मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. कुसुमाग्रजांना वंदन करतो. स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो आणि एवढंच म्हणतो, की तुम्ही जे काही आम्हाला देऊन गेला आहात, ते आम्ही वाढवू जरी शकलो नाही, तरी नक्की आणि नक्की, जपूच जपू एवढीच एक भावना व्यक्त करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.