ETV Bharat / state

'येथील प्रत्येक नागरिक जवान, शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही' - शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही

मला लष्कराची अजिबात गरज नाही, कारण हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. शाहु, फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. येथील प्रत्येक नागरिक हा जवान असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing state
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 8, 2020, 11:00 PM IST

मुंबई - मला लष्कराची अजिबात गरज नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. शाहु, फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. येथील प्रत्येक नागरिक हा जवान असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईमध्ये लष्कर बोलवणार ही केवळ अफवा आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर येणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात आणखी आपल्याला म्हणावे तेवढे यश आले नाही, त्यामुळे आणखी थोडे दिवस सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी आणखी काही दिवस घरातच राहण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबादला झालेल्या परप्रांतीय मजुरांच्या मृत्यूच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले. या घटनेने मी व्यथीत झाल्याचे ठाकरे म्हणाले. कोणत्याही राज्यातील मजुरांनी हताश होऊ नये, राज्य सरकार त्यांच्य़ा पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ठाकरे म्हणाले.

आवश्यकता वाटल्यास केंद्राची मदत घेणार

जिथे जिथे आवश्यकता वाटेल तिथे केंद्रांच्या यंत्रणा वारण्यास परवानगी मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्याला जर समजा रुग्णालये किंना डॉक्टर कमी पडले तर केंद्र सरकारच्या वतीने जी यंत्रणा चालवली जाते तेथील डॉक्टर आणि रुग्णालये देण्यास परवानगी मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. या कोरोनाच्या लढाईत पोलीस खंबीरपणाने लढत आहेत. त्य़ांनाही विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे जर टप्प्याने पोलिसांना विश्रांती देण्याचा विचार असल्याचे ठाकरे म्हणाले. य़ा काळात जर मनुष्यबळ कमी पडले तर केंद्राची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांचे आभार

सर्वक्षीय झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी काही सुचना केल्या होत्या. बऱ्यापैकी सुचनांची अमंलबजावणी झाली आहे. या कोरोनाच्या संकटात सर्व पक्षांनी राजकारण सोडून आम्ही सरकारसोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.