मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे व सदानंद सुळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 64 वर्षीय व्यक्तीचा आगळावेगळा उपक्रम
यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली
शरद पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी पवार म्हणाले, माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या तर वडील नोकरी करायचे. शेतीत पीकलेले धान्य बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही ते करायचे. साधारण १९३६ चा काळ असेल, आमच्या मातोश्री लोकल बोर्डावर होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा? या विचारांच्या त्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्या सदैव आग्रही राहत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आज आम्ही सारे कार्यरत असल्याचे पवार म्हणाले.