ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा येथे चर्चा झाली

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 6, 2020, 12:46 PM IST

मुंबई - रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी (दि. 5 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगला येथे चर्चा झाली. यावेळी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांविषयी चर्चा झाली असल्याचे एका वृत्तसंस्थेकडून समजते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 5 जून) सकाळी रायगड जिल्हा दौऱ्यात अलिबाग येथील निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी (दि. 4 जून) खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासह आढावा बैठक घेतली होती.

हेही वाचा - रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.