ETV Bharat / state

'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी कशी होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं' - ashish shelar demand investigation

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्यूवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे.

puja chavan suicide case
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Feb 23, 2021, 7:03 PM IST

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी कशी सुरू आहे? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावं, असे आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली.

काय म्हणाले मंत्री राठोड?

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्यूवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.

हेही वाचा - संजय राठोड यांनी घेतले मुंगसाजी माऊली यांचे दर्शन; दिग्रस-दारव्हा मतदारसंघात जल्लोष

आशिष शेलारांचा हल्लाबोल -

संजय राठोड यांच्या प्रतिक्रियेवर भाजपच्या नेत्यांनी आक्रमकपणे हल्ला चढवला. पूजा चव्हाण हिच्या प्रकरणातील चौकशी कशी सुरू आहे? याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे सांगावे, असे आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. ते म्हणाले, संजय राठोड आज समाजाची ढाल पुढे करत आपला बचाव करत आहे आणि एक भावनिक आवाहन या वेळेस त्यांनी केला आहे. अशाप्रकारे त्यांच्याकडून बंजारा समाजाच नाव बदनाम करण्याचे काम होत आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून अदृश्य असलेले ते आता बाहेर आले आहेत. अदृश्य मंत्री आत्ता दृश्य झाले आहेत. त्यामुळे आत्ता अदृश्य अशी चौकशीही दृश्य स्वरूपात व्हावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.