नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Karnataka Border Dispute). आज दिल्लीतील संसद भवनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. (meeting on border dispute). केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah). यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे देखील उपस्थित होते.
बैठकीनंतर काय म्हणाले गृहमंत्री? : बैठकीनंतर अमित शाह म्हणाले की, "राजकीय विरोध काहीही असो, दोन्ही राज्यांच्या नेत्यांनी याला राजकीय मुद्दा बनवू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. याला राजकीय मुद्दा न बनवता दोन्ही राज्यातील विरोधी पक्षांनी देखील सरकारला सहकार्य करावे. सीमाप्रश्नावर समिती स्थापन करण्यात आली आहे. असे वाद रस्त्यावरून मिटवले जात नाहीत. सोशल मीडियावर लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक ट्विट केले गेले आहेत. त्यांची ओळख आता पटवली जाईल. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे". बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज अमित शहांसोबत बैठक असून बैठकीत अर्थपूर्ण चर्चा होणे अपेक्षित आहे. आम्ही बैठकीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितावर चर्चा करू. मला आशा आहे की या बैठकीचे सकारात्मक परिणाम होतील".
ट्विटरवर खाते खोलून काही गोष्टींना व्हायरल केले - कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी दोन्ही राज्य एका ज्येष्ठ जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेली जाईल. त्यासाठी या बैठकीत दोन्हीही राज्य सहमत झाले आहेत. यामध्ये फेक ट्विटर खात्यावरून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याचेही लक्षात आले आहे. काही वरिष्ठ राजकीय नेत्याच्या नावाने ट्विटरवर खाते खोलून काही गोष्टींना व्हायरल केले गेले जे गंभीर आहे असही केंद्रिय गृहमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. तसेच, या बेठकीत सर्वसंम्मत निर्णय झाला आहे. तसेच, मी गृहमंत्री या नात्याने राजकीय विरोध बाजूला ठेवून दोन्ही राज्याच्या मुद्याचे राजकारण करू नये अशी विनंती केली आहे. मला विश्वास आहे की विरोधी पक्षातील लोक या संवेदनशील मुद्यावल एकत्र येतील आणि सहकार्य करतील असही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत.
सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये खडाजंगी : बेळगाव शहर तसेच कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील 865 गावांवर महाराष्ट्र दावा करत आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र कर्नाटकने महाराष्ट्राच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, राज्याच्या सीमांशी संबंधित प्रश्न हाताळण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. अलीकडे सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातही कर्नाटकातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये भेट झाली होती. सीमावादानंतरची दोन्ही मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच भेट होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्री गुजरातमधील गांधीनगर येथे पोहोचले होते. यादरम्यान अहमदाबादहून निघताना विमानतळाच्या लाऊंजमध्ये दोघांमध्ये संवाद झाला होता.