ETV Bharat / state

वीजबील प्रश्नी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय, फडणवीसांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार मुख्यमंत्री - मराठा आरक्षण प्रश्न

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नी देखील मुख्यमंत्री ठाकरे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

maratha reservation issue
मंत्रालय
author img

By

Published : Sep 16, 2020, 10:11 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील वीज ग्राहकांना दोन हजार कोटीचे पॅकेज देण्यावर चर्चा होणार आहे. याच बरोबर आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण प्रश्नावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळामध्ये वीजग्राहकांना भरमसाठ बिले आल्याने राज्यभरात उद्रेक वाढला होता. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे यासंदर्भात राज्य सरकारने विचारणा केली होती. परंतु वीज नियामक आयोगाने वीजदरवाढी मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला, त्यानंतर मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली होती.

वित्त विभागाने या प्रस्तावाला आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून या संदर्भात एक बैठक देखील पार पडली आहे. जनतेचा रोष कमी करण्यासाठी वीज बिलामध्ये दिलासा देणे आवश्यक असल्याची सरकारची सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे या संदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडतील. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

मराठा आरक्षणाच्या पेचावर चर्चा-

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये वादळ सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. फडणवीस त्यानंतर बिहार दौऱ्यावर गेल्याने चर्चा झाली नव्हती. मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नी बुधवारी रात्री साडेआठ वाजता चर्चा होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौऱ्यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे. सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच राज्य सरकार मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढणार असल्याची माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.