ETV Bharat / state

Eknath Shinde : राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार - मुख्यमंत्री, बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानाला दिली भेट - राजगृह एकनाथ शिंदे

६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाला भेट देऊन ( CM Eknath Shinde Visit to Rajgriha ) बाबासाहेबांचे ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंच्या प्रदर्शनाचा आढावा घेतला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 16, 2022, 8:13 PM IST

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde Visit to Rajgriha ) यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानाला दिली भेट

मुख्यमंत्र्यांची राजगृहाला भेट - ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाला भेट देऊन बाबासाहेबांचे ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंच्या प्रदर्शनाचा आढावा घेतला. राजगृहातील डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांशी बंद दाराआड चर्चा - मुख्यमंत्र्यांनी यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्याशी 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली. तसेच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत सल्लामसलत केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. पण इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीमागे कोणतही राजकारण नाही. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. बाबासाहेबांची वास्तू पाहणे हाच भेटीचा हेतू होता. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऐतिहासिक ठेवा जोपासणार - बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळेच समाधान लाभले आहे. या वास्तूत बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू, त्यांचे ग्रंथालय अजूनही जसेच्या तशाच आहेत. त्यांचा टेबलही तसाच आहे. ही वास्तू बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे या इमारतीला पिल्लर नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे मोठे भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे

दुर्मिळ वस्तूंचा संग्रह - राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा यात समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ' जनता ' वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानांची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे. येथेच मजल्यावर डॉ. बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यानंतर राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.