मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात नुकत्याच झालेल्या भूस्खलनात आई - वडील गमावलेल्या मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्तक घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, इर्शालवाडी भूस्खलनात अनेक मुलांनी त्यांचे आई - वडील गमावले आहेत. या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालक बनण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांची काळजी घेणार : 2 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील या अनाथ मुलांची काळजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे म्हणाले की, मुलांच्या शिक्षण आणि इतर बाबींचा सर्व खर्च एकनाथ शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) सुद्धा केली जाईल.
मृतांचा आकडा 26 वर पोहोचला : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) शनिवारी देखील भूस्खलनग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे आणखी एक पथक आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. यानंतर आता आणखी काही टीम शोध मोहिमेत सामील होण्याची अपेक्षा आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर : मुंबईपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात डोंगर उतारावर असलेल्या या आदिवासी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दुर्घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाह म्हणाले की, बचाव कार्य हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
-
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…
">ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…
हे ही वाचा :