मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला असताना, विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी हा मुद्दा अग्रस्थानी ठेवत, सरकारच्या मवाळ भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धारेवर धरले. विरोधकांच्या या प्रश्नांना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर (CM secret explosion in winter session) दिले. सीमावादाचे प्रश्न सरकार सोडवत आहे. कोणाही राजकारण करु नये, असे आवाहन केले. तसेच कर्नाटकात जाण्याचे जे ठराव सीमावासीयांना करायला लावले जात आहेत, त्याची माहिती पोलिसांमार्फत मिळाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात (CM on border dwellers decision to go Karnataka) केला.
सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सीमावाद प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कानडी अरेरावीवर जाब विचारला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय झाले, त्याची माहिती पटलावर ठेवा, अशी मागणी केली. तसेच कर्नाटकाची मुजोरी सुरू असताना राज्य सरकारने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेकडे सभागृहाचे लक्ष (parties behind border dwellers decision) वेधले.
अनुदान बंद : मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देताना, सीमावर्ती भागातील 48 गावांची दोन हजार कोटींची योजना मंजूर केली आहे. अडीच वर्षात तुम्ही सीमावासीयांच्या योजना बंद केल्या होत्या. त्यांचे अनुदान बंद केले. त्यामुळे सीमा वासियांबद्दल तुम्ही काय सांगू नका, संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सीमावासीय कर्नाटकात जाण्याचे जे ठराव करत, त्यामागे कोणते पक्ष आहेत याची माहिती आम्हाला पोलिसांकडून मिळाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. असे मुख्यमंत्री (border dwellers decision to go Karnataka) म्हणाले.
सीमाप्रश्न मुद्दा महत्त्वाचा : विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला सीमाप्रश्न मुद्दा महत्त्वाचा आहे. मी आणि देवेंद फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंकडे गेलो होतो. पहिल्यांदाच या प्रश्नावर देशाच्या गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली. हे पहिल्यांदाच घडले आहे. त्याबद्दल तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचे आम्ही अमित शाह यांना सांगितले. आम्ही महाराष्ट्राची ठोस बाजू घेतली आहे. महाराष्ट्राच्या गाड्या अडवल्या जातात, जाळपोळ होते. त्यामुळे असा प्रकार होऊ नये अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते असे, आम्ही गृहमंत्र्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री सभागृहात स्पष्ट केले. तसेच गृहमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तंबी दिली. अशा प्रकारचे काही प्रकरण होऊ नये. दोन्ही राज्यातील लोकांना त्रास होऊ नये. महाराष्ट्रातील पक्षांनी यात राजकारण करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आवाहन (CM Eknath Shinde in winter session) केले.