ETV Bharat / state

CM Eknath Shinde on Refinery Row : बारसूत आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, मात्र मुख्यमंत्री म्हणतात, काहीच झाले नाही... - तालुकाप्रमुख सदा सरवणकर

बारसूत सध्या रिफायनरीवरून आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याभागात सध्या शांतात आहे. तसेच लाठीचार्ज झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. रिफायनरीवरून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत.

CM on Barsu Refinery
CM on Barsu Refinery
author img

By

Published : Apr 28, 2023, 3:47 PM IST

Updated : Apr 28, 2023, 8:28 PM IST

एकनाथ शिंदे यांची बारसूत लाठीचार्ज न झाल्याची माहिती

मुंबई : बारसू येथील रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. येथील आंदोलन शुक्रवारी सर्वेक्षण सुरू असलेल्या भागात दाखल झाले. त्यांना रोखताना पोलिसांची दमछाक झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. या सर्व धावपळीचा आंदोलकांना त्रास सहन करावा लागत आहे. तीव्र उष्णतेमुळे काही आंदोलक जागीच कोसळ्याची घटना घडली आहे. उन्हामुळे कोसळलेल्या आंदोलकांमध्ये महिलांचा समावेश होता. आंदोलक अश्रुधुरामुळे बेशुद्ध झाल्याचा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने केला आहे. ही जमीन कोकणात आहे. जर तुम्हाला मारायचे असेल तर, आम्हाला मारा आणि तुम्हाला हवे ते करा, आम्ही काहीही झाले तरी डगमगणार नाही.

खासदार विनाय राऊतांना अटक : खासदार विनाय राऊत आंदोलकांशी भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी अटक करून घटनास्थळावरून नेले आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, 'फडणवीस यांचे भूमाफिया, दलाल हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी असे प्रकार करीत आहेत'.

नेत्याची धरपकड सुरू : बारसूत मोर्चाचे नियोजन सुरू झाले. गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी काही स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला होता. सकाळी विनायक राऊत यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतल्याने आंदोलन चिघळले. यासाठी खासदार राऊत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख सदा सरवणकर यांच्यासह ठाकरे शिवसेना पदाधिकारी येथे जमले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालच्या चर्चेत स्थानिकांनी सरकार, प्रकल्पाच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला. परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे लक्षात येताच ठाकरे गट मुंबईतील काही मंडळींनी प्रत्यक्ष पाहणीच्या ठिकाणी हिंसाचार, आंदोलनाची भडकवत असल्याचा आरोप सरकाकडून करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

आम्हाला गोळ्या घाला : रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीतील बारसूत येथे सोमवारपासून सुरू झालेले आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखीनच तापले. आंदोलक वृद्ध महिलांवर सशस्त्र पोलिसांचा लाठीमार, दडपशाही लाठीचार्ज यामुळे आंदोलकांचा संताप वाढला. माती परीक्षणासाठी येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यासमोर शेकडो महिलांनी लोटांगन घेतले. ‘आमच्यावर गाड्या घाला, गोळ्या घाला, पण प्रकल्प हद्दपार होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,’ अशा घोषणा देत त्यांनी प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, आंदोलन चिरडण्याचा डाव आखणाऱ्या 'ईडी' सरकारने पोलिसांना आदेश देत शेकडो आंदोलकांना गाड्यांमध्ये भरून रत्नागिरीला नेले. यावेळी महिलांनी शासनाच्या जुलमी कारभाराचा निषेध करत अन्यायाविरोधात टाहो फोडला.

लाठीचार्ज : प्रस्तावित 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल प्रकल्प', कोकणातील पारंपारिक उद्योग, निरसग, फळबागा, मत्स्यव्यवसाय बुडवून टाकणारा प्रकल्प नाणारमधून हद्दपार केल्यानंतर आता हा प्रकल्प सरकारने बारसू, सोलगाव येथे सुरू करण्याचा घाट घातला आहे. मात्र बारसू, सोलगाव, पंचक्रोशीतील रहिवाशांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. माती परीक्षणाच्या नावाखाली हा प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. सकाळपासून प्रशासन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आंदोलक रात्रंदिवस ठाण मांडून आहेत. या ठिकाणी आंदोलकांना लाठीचार्ज करून हटवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आंदोलक महिला, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक अधिकच चिडले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांकडून मोबाईल फोन जप्त केला. ज्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये लाठीचार्जिंगचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता अशा महिलांना पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आले आहे.

आंदोलक अस्थिर : रिफायनरीविरोधी आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले असले तरी हजारो रहिवासी अजूनही प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

पत्रकारांना धक्काबक्की : बारसूत येथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने विविध प्रसारमाध्यमांनीही प्रकल्पस्थळी धाव घेत आंदोलकांच्या भावना, सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यास सुरुवात केली, मात्र पोलिसांच्या दडपशाहीमुळे प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी रिपोर्टिंग करतांना काही माध्यम प्रतिनिधींना हाकलून लावण्याचा प्रयत्न झाला. यानंतर प्रसारमाध्यमांना 10 ते 15 किमी अंतरावर थांबवण्यात आले. पोलिसांनी त्यांना सांगितले की, त्यांना पुन्हा तिथे दिसायचे नाही. या घटनेचा रत्नागिरीतील पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध केला आहे.

सशस्त्र पोलिसांची घेराव : बरसूत रिफायनरीमुळे बाधित झालेल्या सोलगावसह शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे, धोपेश्वर पंचक्रोशीतही आंदोलनाचे वारे पसरले आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांच्या गाड्या अश्रूधुराच्या नळकांड्या, लाठीमार करत रात्रंदिवस फिरत असून सशस्त्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

माती परीक्षण सुरू : कोकणवासीयांच्या तीव्र विरोध, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दडपशाही केली असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. दुपारी बारसूमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात माती परीक्षण सुरू केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आंदोलकांनी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत घोषणाबाजी केली. प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतीही घटना व्हायरल होऊ नये म्हणून पोलीस आता सर्वांचे मोबाईल जप्त करत आहेत.

हेही वाचा - Barsu Refinery Row : बारसू रिफायनरी आंदोलन चिघळले; सर्वेक्षणावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Last Updated : Apr 28, 2023, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.