मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात काल जी 20 परिषदेसंदर्भात सूचना(occasion of G20 conference) , चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला हजर होते. दरम्यान, जी 20 परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
14 बैठका होणार : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वित्तमंत्री निर्मला सितारमण, पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित होते. यासह विविध पक्ष प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद) या चार ठिकाणी जी 20 परिषदेच्या 14 बैठका होणार (Shinde reacted on occasion of G20 conference) आहेत.
जी 20 बैठकीचे स्वरूप : यानिमित्त राज्याचे ब्रॅंडींग, राज्यातील विकासाचे प्रकल्प, आपली संस्कृती, जगासमोर मांडण्याची संधी लाभली आहे. यादृष्टीने राज्यात गतीने कामे सुरू असल्याचेही ते यावेळी (state will get opportunity to showcase) म्हणाले. राज्यात आतापर्यंत जी-20 परिषदेच्या (G20 conference) संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली. तसेच जी 20 बैठकीचे स्वरूप कसे असेल याबाबत याप्रसंगी सादरीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.