ETV Bharat / state

​CM Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना खासदारांसोबत बैठक, निवडणुकीबाबत होणार चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.

​CM Eknath Shinde Meeting
शिंदेंनी बोलावली खासदारांची बैठक
author img

By

Published : May 23, 2023, 6:16 PM IST

मुंबई: राज्यात येत्या पाच महिन्यांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसाठी भाजपने महाराष्ट्रात 'मिशन ४८' ठेवले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. दरम्यान, भाजपने राज्यात २०१४ आणि २०१९ मध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ च्या निवडणुकीत तेवढ्याच जागा जिंकू, तुम्ही निश्चित राहा, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.

अमोल किर्तीकर उतरले रिंगणात: दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला शह देण्याच्या हालचाली सु​​रू केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे. नुकतीच शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन धोरण आखले आहे. शिवसेना सोडलेल्या खासदारांविरोधात नवा उमेदवार देऊन, त्याला निवडून आणण्याची तयारी सुरु केली आहे. उत्तर मुंबई पश्चिम लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांच्या विरोधात अमोल किर्तीकर यांना रिंगणात उतरले जाणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवारांची कोंडी करण्याची ठाकरेंची रणनिती आहे.

महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार: या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिंदे गटाच्या खासदारांची आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रचना ठरवली जाणार आहे. निवडणुकीसाठी विद्यमान खासदारांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या खासदारांची आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. - मुख्यमंत्री शिंदे

जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान जे पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली होती.

हेही वाचा -

  1. Cabinet Expansion लवकर होणार मंत्रिमंडळाचा विस्तार भाजप शिंदे गटातील प्रत्येकी ७७ मंत्र्यांचा समावेश
  2. Ajit Pawar On Bjp वर्षानुवर्षे परंपरा चालु आहे त्यात जातीय तेढ निर्माण करू नका अजित पवार
  3. Sachin Vaze Extortion Case खंडणी वसुली प्रकरण सचिन वाझेची सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.