ETV Bharat / state

Shiv Jayanti 2023 in Russia: रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या मराठी तरुणांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद - Shiv Jayanti 2023 in Russia

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रशियामध्ये शिवजयंती साजरी करणाऱ्या मराठी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि शिवरायांच्या कार्याची महती विशद केली.

Shiv Jayanti 2023 in Russia
मराठी तरुणांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
author img

By

Published : Feb 20, 2023, 9:01 PM IST

Updated : Feb 20, 2023, 9:29 PM IST

रशियातील तरुणांसी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: रशियामधील ओशत स्टेट विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ७५० मराठी तरुणांनी यंदा शिवजयंती साजरी केली. त्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. सातासमुद्रापार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या तरुणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री? यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण आपल्या मातृभूमीपासून लांब राहूनही शिवजयंतीचा सण साजरा करत आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मी स्वतः देखील आग्र्यामधील लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी जात असतो. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र तुम्ही सगळ्यांनी आपला अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून शिवजयंती साजरी करत आहात, ही खरच फार मोठी गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्र्यांनी या भावी डॉक्टरांना सांगितले.

तरुणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार: मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादामुळे शिवप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. आपला शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल या तरुणांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेतील टाईम्स स्वेअर परिसरात अशाचप्रकारे कार्यक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून आभार व्यक्त केले होते.

रशियातील फायर डान्सिंग शो: जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. मागील काही वर्षांत बीड शहरात एक वेगळी मेजवानी शिवप्रेमींना मिळते. यामध्ये युक्रेन आणि रशियातील फायर डान्सिंग शो बीडकरांना अनुभवायला मिळाला.

कलावंतांनी जिंकले बीडकरांचे मन: सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्धाचे सावट आहे. झालेल्या युद्धात दोन्ही देशातील नागरिक मरण पावले. परंतु बीडमध्ये या दोन्ही देशातील कलाकार शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकत्र आले. बीडकरांचे मनसोक्त मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. फायर डान्सच्या माध्यमातून आपापल्या देशातील अनोखी कला युक्रेन आणि रशियातील कलावंतांनी दाखवत बीडकरांचे मन जिंकले. बीडकरांनीही त्यांचे भरभरून कौतुक आणि प्रोत्साहन देत उत्साह दाखवला. आमदार संदीप क्षीरसागर यांची सार्वजनिक शिवजयंती ही आता महाराष्ट्रभर प्रचलित होत आहे.

कलाकारांचा थरार: दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षात बीडमध्ये वेगवेगळ्या राज्यातील कलावंत आणून त्यांची कलाकारी आस्वादासाठी या शिवजयंतीच्या माध्यमातून मिळते. मात्र यावर्षी नाशिक ढोल, साउथ इंडियन वाद्य, पंजाबमधील कलाकारांची थरार करणारी अनेक कलाकारी, त्याचबरोबर रशिया आणि युक्रेंनचे फायर डान्सिंग कलावंत विशेष आकर्षण ठरले. ही शिवजयंती नागरिकांना लोभनीय आणि आकर्षक करणारी होती.

हेही वाचा: Farmer Guide to IAS: विदर्भाचा शेतकरी करणार आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन, वाचा सविस्तर

Last Updated : Feb 20, 2023, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.