ETV Bharat / state

Anil Jaisinghani Case : अनिल जयसिंघानी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संबंधांची होणार चौकशी

author img

By

Published : Mar 19, 2023, 5:50 PM IST

अनिल जयसिंघानी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील संबंधांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानी सोबत एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यावरून ही चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Anil Jaisinghani Case
अनिल जयसिंघानी

मुंबई : ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांचे अनिल जयसिंघानीसोबत नेमके काय संबंध आहेत? याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये उद्धव ठाकरे फरार जयसिंघानी याचे स्वागत करत असल्याचे दिसून येत आहे. 2014 साली जयसिंघानीने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जयसिंघानी पुन्हा चर्चेत : अनिल जयसिंघानीवर एकूण 17 गुन्हे दाखल असून त्याला जुगार आणि सट्टा लावण्याच्या गुन्ह्याखाली तीन वेळा अटक करण्यात आली होती. सोबतच एकूण 5 राज्यांच्या पोलिसांसाठी अनिलचे मोस्ट वोन्टेड गुन्हेगारांच्या यादीत नाव आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी बँक अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी फरार अनिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमृता फडणवीस यांच्या खंडणी प्रकरणात अनिलची 25 वर्षाची मुलगी डिझायनर अनिक्षा हिला गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणाचे पडसाद विधान भवनात उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नीच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय? असे म्हणत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांची बदनामी करण्याचा कट? : एका बाजूला महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याची संधी शोधत असतानाच दुसऱ्या बाजूला फरार अनिल याचे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे विरोधकांचा डाव उलटा पडला आणि मुख्यमंत्र्यांनी या व्हायरल फोटोची दखल घेत फरार अनिलचे महाविकास आघाडीतील नेत्यांशी काही संबंध आहेत का? त्यांचे काय व्यवहार झाले? त्यांचे कोणत्या प्रकारचे संबंध आहेत? अनिल अद्याप देखील महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या संपर्कात आहे का? इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये. यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा कट आहे का? याचा देखील शोध घेतला जाईल. त्यामुळे अनिलचे फोटो आणि महाविकास आघाडीचे संबंध या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा : Amruta Fadnavis Blackmail Case : पत्रकारितेच्या आडून अनिल जयसिंघानी बनला इंटरनॅशनल बुकी; ब्लॅकमेल प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.