ETV Bharat / state

CM Eknath Shinde : बरं झालं विरोधक चहापानाला आले नाहीत, नाहीतर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लागला असता - मुख्यमंत्री शिंदे

author img

By

Published : Feb 26, 2023, 8:56 PM IST

जर ते चहापानाला आले असते तर माझ्यावर देशद्रोह झाला असता, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी मात्र ठरल्याप्रमाणे बहिष्कार घातला आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी ठरल्याप्रमाणे बहिष्कार घातला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विरोधकांना धारेवर धरत त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या चहापाण्याला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.

धोरणात्मक निर्णय होतील: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठरल्याप्रमाणे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अधिवेशनात राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न यावर चर्चा होईल. अनेक विधायके आहेत. राज्यातील जनतेला काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. अतिशय महत्त्वाचे अधिवेशन असून जनतेच्या अपेक्षा मोठ्या असतात. जनतेच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. २२ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे ५ लाख पेक्षा जास्त हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मुंबई मेट्रो, राज्यातील विकास प्रकल्प तसेच सर्व रखडलेल्या योजना आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होतील.

पारकर बरोबर व्यवहार कोणी केला?: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधक म्हणतात चहापाण्याला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. बरे झाले त्यांच्याबरोबर चहापाण करण्याची वेळ टळली. त्यांच्या नेत्यांनी हसीना पारकर बरोबर व्यवहार करून देशद्रोह केला आहे. जर ते चहापाण्याला आले असते तर माझ्यावर देशद्रोह झाला असता, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांची अजित पवारांवर टीका: निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण ही निशाणी आम्हाला दिली आहे. लोकांचे प्रेम आमच्यावर खूप आहे. याचा अजित पवार यांना इतका पोटशूळ का? अजित पवारांनी दिवसातून ३ वेळा भूमिका बदलली. मार्केटमध्ये माझे थोडे वजन आहे. आरोप करताना काही तथ्य लागतात, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना सोडल्यावर काय होते, ते बघा असे अजित पवार म्हणाले होते. तुम्ही कधी शिवसैनिक झालात? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर पणे उभे राहील. असेही ते म्हणाले.

लोकायुक्त कायदा पारित करणार: पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३ वर्षाने ४ आठवड्याचे अधिवेशन होत आहे. सामान्य माणसांच्या हितासाठी निर्णय व्हावेत ही अपेक्षा आहे. ३ बिल प्रलंबित आहेत. त्यात विधानपरिषदेत लोकायुक्त बिल करण्यासंदर्भात आम्ही आग्रह धरणार आहोत. सर्व पक्षांनी लोकायुक्त सारखा जो कायदा आहे त्याला मदत करावी व मंजूर करावा. कारण त्यात पारदर्शकता आहे. ८ मार्चला आर्थिक पाहणी अहवाल व ९ मार्च ला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल.

राहुल गांधींचा निषेध: विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर टीका करताना उपमुख्यंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधकांची नेहमीचे कारणे व अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया तयार असतील. आज स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागे तुमची मजबुरी होती आता मजबुरी काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत, आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.

सरकार कमी पडणार नाही: उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजेंद्र चव्हाण यांचे जे काही प्रकरण आहे त्यात त्यांना फक्त २ रुपये मिळाले. कारण त्यात वाहतुकीचा खर्च कापण्यात आला. केवळ २ रुपये त्यांना भेटले यामुळे सूर्या ट्रेडर्स यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कांद्या संदर्भात आपल्या बाजूचे जे ३ देश आहेत. श्रीलंका, बांगलादेश व पाकिस्तान या देशात परकीय चलनाचा तुटवडा असल्या कारणाने पीक अधिक असून निर्यात करता येत नाही. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्ये संदर्भात वेगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आपण एक्स्पर्टची मदत सुद्धा घेत आहोत. या संदर्भात कुठेही सरकार कमी पडले नाही.

राऊतांच्या धमकीवर काय म्हणाले?: संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी यात चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की माझ्या उपसंपादक यांनी सांगितले की मला एका कार्यक्रमात माझ्यावर शाई फेकली जाणार आहे. अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड या सर्वांवर आमचे लक्ष आहे. पण केवळ अतिरंजित माहिती देऊन असे वागू नये, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पुण्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री व मी निवडणूक प्रचाराला गेलो म्हणून अजित पवार यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात ६ हजार कोटी शेतकऱ्यांना दिले तर आम्ही ७ महिन्यात १२ हजार कोटी दिले आहेत. २३ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. जिल्हा निधी पूर्णपणे खर्च केला जाईल. एमपीएससी चा पाठपुरावा करून आम्ही तो निर्णय घेतला. हे महाविकास आघाडी सरकारने करायला हवे होते. संभाजी नगर, धाराशिव ही नावे देण्यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन निघेल. यासाठी केंद्र सरकारचे आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: Sanjay Raut on Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा; खासदार संजय राऊतांचे केंद्र सरकारला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.