मुंबई - राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडला.
LIVE -
8.00 PM - राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी 50 आमदार उपस्थित असल्याची माहिती माध्यम सुत्रांनी दिली. मात्र, 40 आमदारांची उपस्थिती असल्याची माहिती नवाब मलीक यांनी दिली.
7.50 PM - राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी; जयंत पाटील यांची नवनियुक्ती
7.30 PM - 23 नोव्हेंबर हा इतिहासातील काळा दिवस - काँग्रेस
6.55 PM - राष्टवादीच्या बैठकीत 42 आमदार सध्या उपस्थित आहेत. वायबी सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे.
6.40 PM - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेला शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप
6.25 PM - महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया
6.00 PM - उद्धव ठाकरे यांनी ललित हाॅटेलमध्ये घेतली शिवसेनेच्या आमदारांची भेट
5.55 PM - हाॅटेल ललितमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली असून आमदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहचले -
5.30 PM - गायब असलेले धनंजय मुंडे हे देखील वायबी चव्हाण मधील राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले आहेत.
5.25 PM - विधीमंडळाची ग्रामपंचायत आणि मुख्यमंत्र्यांचा सरपंच झाला - माजी खासदार राजू शेट्टी
5.25 PM - महाराष्ट्रात स्थापन सरकार हे जास्ती दिवस टिकणार नाही. तसेच पंजाबमधील राष्ट्रवादी ही शरद पवारांसोबत असल्याची माहिती पंजाबचे राष्ट्रववादीचे प्रदेशाध्यक्ष स्वारना सिंग यांनी दिली आहे.
5.00 PM - सुनील तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली असून यात त्यांची मनधरणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
4.50 PM - राष्ट्रवादीचे खासदर सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला
4.45 PM - राष्ट्रवादीचे दोन आमदार शरद पवारांसोबतच; वल्लभ बेनके, दिलीप मोहिते असे त्या आमदारांचे नावं
4.42 PM - उद्धव ठाकरे 'द ललित' हाॅटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची भेट घेण्यासाठी दाखल, सोबत अनिल परब आणि आदित्य ठाकरे
4.40 PM - दौलत दरोडा, नरहरी जरीवार, सुनील भुसारा, दिलीप बनकर, अनिल पाटील, सुनील शेळके, नितीन पवार, बाबासाहेब पाटील, संजय बनसोन हे 9 राष्ट्रवादीचे आमदार चार्टर्ड प्लेनने दिल्लीला जाणार आहेत.
4.35 PM - अजित पवारांच्या पाठिंब्यावर मजबूत सरकार देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मोदी है तो मुमकिन है...असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
4.30 PM - मुंबई भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवेीस दाखल झाले असून कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.
4.10 PM - मुंबई भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवेीस दाखल; जल्लोष सुरू
3.10 - रवीशंकर प्रसाद
- चोर दरवाज्यातून मुंबईसारख्या आर्थिक राजधानीवर कब्जा करण्याचा इतरांचा प्रयत्न होता
- सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यपालांकडे दावा केला होता काय?
2.57 - राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे मी नुकतेच म्हणालो होतो. आता तुम्हाला माझ्या वक्तव्याचा अर्थ समजला असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
2.52 - भाजपने नितिमत्ता सोडली आहे, तर संघाने त्यांना हीच नितिमत्ता शिकवली का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
1.53 - काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे -
अहमद पटेल -
- आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या शाहीने नोंदवला जाईल.
- राज्यपालांनी काँग्रेसला संधी दिली नाही.
- कुठलीही चौकशी न करता शपथविधी घेतला.
- संविधान आणि लोकशाहीची खिल्ली उडवली.
- भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला
- काँग्रेसचे सर्व आमदार आमच्यासोबतच.
- सरकार महाविकासआघाडीचेच येणार.
- भाजपला बहुमत सिद्ध करू देणार नाही.
- शरद पवारांनी ४ वाजता तीनही पक्षांची बैठक बोलावली.
1.35 - अजित पवारांना ब्लॅकमेल केले आहे. ते पुन्हा परत येणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपचे ३५ आमदार आमच्या संपर्कात असून नितीन गडकरींचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
1.31 - राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे :
शरद पवार -
- भाजपसोबत जाण्याचा अजित पवारांचा निर्णय हा शिस्तभंगाची कारवाई करायला लावणारा निर्णय आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता हा भाजपबरोबर जाणार नाही याचा मला विश्वास आहे.
- अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी.
- जे सदस्य भाजपसोबत गेले आणि जाणार असतील त्यांना सांगायचे आहे की आपल्या देशात पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द होईल हे नाकारता येत नाही.
- ५४ लोकांच्या सह्या असलेला कागद अजित पवारांनी पळवला आणि तोच कागद राज्यपालांना सादर केला. त्यामुळे राज्यपालांचीही फसवणूक झाली की काय? असे पवार म्हणाले.
- भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही.
उद्धव ठाकरे -
- केंद्रीय मंत्रीमंडळाची पहाटेच्या सुमारास बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फर्जिकल स्ट्राईक केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
- 1.02 - अजित पवारांसोबत राजभवनात गेलेल्या आमदारांपैकी संदीप क्षिरसागर आणि आणखी एक आमदार पत्रकार परिषदेत उपस्थित.
- 1.00 - शिवसेनेचे काम म्हणजे टीव्हीवरील मालिका नसतात, रात्रीस खेळ चाले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. पहाटे केंद्रीय मंडळांची बैठक पार पडली असल्याचेही त्यांनी सांगितले.
- 12.50 - अजित पवारांसोबत १० ते ११ आमदार गेले असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असा दावा देखील शरद पवार म्हणाले.
- 12.43 - भाजपची दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद
- 12,40 दु. - अजित पवारांसोबत गेलेले आमदार -
- आमदार निलेश लंके
- किरण लमहाटे
- संग्राम जगताप
- प्राजक्त तनपुरे
- वल्लभ बेनके
- दिलीप मोहिते पाटील
- सतीश चव्हाण
- माणिकराव कोकाटे
- दिलीप बनकर
- अण्णा शेळके
- संदीप क्षीरसागर
- 12.17 दु. - वाय. बी. चव्हाण सेंटरच्याबाहेर शरद पवार आगे बढो, तर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा
- 12.15 दु.- सुप्रिया सुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना स्वतः वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये घेऊन गेल्या.
- 12.07 दु. - अजित पवारांची विधीमंडळ गटनेता पदावरून हटवले
- 11.35- अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण वाय बी सेंटरवर दाखल.
- 11.32- शरद पवार, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल वाय बी सेंटरवर दाखल
- 11.21 - शरद पवार वीय. बी. सेंटरकडे रवाना
- 11.20 - एकनाथ शिंदे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तर, शिवसेना भवनात शुकशुकाट
- 11.13 - पक्ष आणि कुटुंबामध्ये फुट पडल्याचे व्हॉट्सअॅप स्टेट्स सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. तसेच त्यांनी शरद पवारांच्या ट्विटरवरील वक्तव्याला पाठिंबा दिला.
- 11.10 - आमदारांच्या हजेरीचा कागदाचा अजित पवार यांनी गैरवापर केला असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
- 10.54 - धनंजय मुंडे आणि अजित पवार वगळता सर्व आमदार शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर दाखल
- 10.51 - सर्व आमदार द ललित हॉटेमध्ये असताना एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातच आहेत. त्यामुळे ते ठाण्यात काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- 10.47 - महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वरुपात स्थिर सरकार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे जे. पी. नड्डा म्हणाले.
- 10.33 - मुंबईमध्ये काँग्रेसची तत्काळ बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत.
- 10.31 - शरद पवारांनी सर्व आमदारांना बोलावले आहे. सर्व आमदारांसोबत ते आज दुपारी साडेचार वाजता बैठक घेणार आहेत.
- 10.17 - येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे.
- 10.14 - आज दुपारी १२.३० वाजता शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
- 10.04 - अजित पवारांनी सर्व आमदारांच्या सह्या घेऊन आम्हाला पत्र दिले. त्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
- 9.56 - शिवसेनेने एकदाही चर्चा केली नाही. तसेच संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली - चंद्रकांत पाटील
- 9.45 - अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला - संजय राऊत
- 9.30 - महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही त्याला पाठिंबा देत नाही, असे शरद पवार म्हणाले.
- 9.28 - हा राष्ट्रवादीचा निर्णय नाही. तसेच शरद पवारांचा याला पाठिंबा नाही, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल म्हणाले.
- 9.16 - महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रपती राजवट बरखास्त.
- 9.14 - शपथविधीला राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थितीत होते. तसेच त्यांच्या नेत्यांनी फोन देखील बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे याबाबतीत संभ्रम निर्माण होत आहे.
- 8.48 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन - नितीन गडकरी
- 8.47 - भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्याची सूत्रांची माहिती
- 8.44 - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
- 8.20 - अजित पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला - देवेंद्र फडणवीस
- 8.15 - नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढल्याने आम्ही हा निर्णय घेतला - अजित पवार
- 8.08 - पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना देखील शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला होता. मात्र, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. सर्व बैठका देखील पार पडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मात्र, त्यानंतर देखील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीने सोबत येत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान मोदी भेटीमध्ये याचे खलबते झाले होते की काय? असेही बोलले जात आहे.