मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरूद्ध खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणावरून विरोधक फडवणीस यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सायन वडाळा मतदारसंघात स्वछता मोहिमेसाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुप्रीम कोर्ट आणि शिवसेना लहान भाऊ का? असा प्रश्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार देत घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
आज सायन कोळीवाडा येथे स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महापुरुषांच्या तत्वावर चालले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीच्या विचारावर देश उभा केला असल्याचे फडवणीस म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार सरदार तारा सिंह, कालिदास कोळंबकर, तमिळ सिल्वन, मंगलप्रसाद लोडा, प्रसाद लाड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उमेदवार तमिल सिल्वन यांचे प्रचार पत्रही काही घरात वाटले.